Download App

दसरा मेळाव्यावरुन रणकंदन; ‘चिरडून टाका’ म्हणणाऱ्या राऊतांना शिरसाटांनी सुनावलं…

Thackeray Vs Shinde : संजय राऊतांना आर्मी कशाला पाहिजे, दोन पोलिस पाठवले तर पळून जाईल, या शब्दांत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट(Sanjay Shirsath) यांनी राऊतांना सुनावलं आहे. आगामी दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर व्हावा, यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून रस्सीखेच सुरु आहे. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी शिंदे गटाला थेट चॅलेंजच केलं होतं. त्यावरुन संजय शिरसाटांनी राऊतांना सुनावलं आहे.

विमानात नवजात बाळाला श्वसनाचा त्रास; मराठमोळा IAS अधिकारी 6 महिन्याच्या मुलासाठी ठरला देवदूत

पुढे बोलताना संजय शिरसाठ म्हणाले, दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ मैदान आम्हालाच मिळालं पाहिजे, आम्हाला नाही मिळालं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य तो निर्णय घेतील. विरोधक सत्तेत असताना त्यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची साधी विटही रचता आलेली नाही, शिवसेना प्रमुखांचे विचार आम्हाला पुढे न्यायचे आहेत, संजय राऊतला आर्मी कशाला पाहिजे, दोन पोलिस आले तर पळून जाईल, या शब्दांत शिरसाट यांनी राऊतांना सुनावलं आहे.

तेलंगणा जिंकण्यासाठी पंतप्रधान मोदींचा ‘मास्टरस्ट्रोक’; 13 हजार 500 कोटींच्या पॅकेजची घोषणा

तसेच ठाकरे गटाच्या नेत्यांना महापौर बंगला बळकावयचा आहे. त्यांना शिवसेना प्रमुखांबद्दल काही आस्था नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ही कोणाची खाजगी संपत्ती नसून त्यांनी आम्हाला घडवलं आहे, त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही दसरा मेळावा घेत असल्याचंही शिरसाट यांनी स्पष्ट केलं आहे.

Weather Update : सावधान ! आजही मुसळधार पाऊस; हवामानाचा अंदाज काय ?

काय म्हणाले होते संजय राऊत?
दसरा मेळावा जिथं होतो तिथं इतिहास होतो, 50-55 वर्षांपासून आम्ही दसरा घेत आहोत. आता हे बेईमान लोकं त्याच्यावर दावा सांगातहेत. शिवसेनेची, मराठी माणसाची ताकद कमी करणं हेच आहे. हे षडयंत्र आहे. शिवसेनेच्या समोर शिवसेनेच्या लोकांचं आव्हान उभं केलं जात आहे.

“बाप आजारी असताना सरकारी पैशावर लंडनमध्ये मजा मारणार्‍याने…” : ठाकरेंच्या टीकेवर शेलारांचा पलटवार

तुम्ही कितीही आव्हानं द्या, रॅली होणारच आणि ही रॅली शिवतीर्थावरच होणार. तुमच्या सत्तेने आम्हाला चिरडण्याचं काम केलं, दिल्लीतून आर्मी बोलावली तरी आम्हाला काहीच फरक पडत नाही. रॅली होणारच आणि तीही शिवतीर्थावरच, असं संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं.

दरम्यान, दसरा मेळाव्यावरुन शिवसेनेच्या शिंदे-ठाकरे गटामध्ये जोरदार संघर्ष पेटल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. मागील वर्षी ठाकरे गटाला दसरा मेळाव्याची परवानगी देण्यात आली आता, यंदाच्या वर्षी कोणाचा दसरा मेळावा शिवतीर्थावर गाजणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us