प्रशांत गोडसे, मुंबई प्रतिनिधी
Uday Samant Criticized Mahavikas Aghadi Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप करत आहे. यावर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. उदय सामंत म्हणाले की, एकीकडे ईव्हीएमच्या नावावर बोंबाबोब करायची, ही दुटप्पी भुमिका महाराष्ट्राला समजली म्हणून ते 40 ते 50 जागांवर आले.
शिवसेनेच्या 3 नेत्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवणार?, दिल्लीतून हिरवा कंदील आल्यावर होणार शिक्कामोर्तब
उदय सामंत म्हणाले की, आता मविआमध्ये पण फूट पडत (Maharashtra Politics) आहेत. लोकांची माथी भडकवायची हा विरोधकांचा डाव आहे. आमदारकीची शपथ हे आज घेतील, असं वाटतंय. शरद पवारांवर बोलताना सामंत म्हणाले की, नियम लावताना खासदारकीला एक आणि विधानसभेला एक नियम लावायचा, पिटिशन पण नाकारली आहे असं देखील त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्र वक्फ बोर्डाचा शेतकऱ्यांच्या 300 एकर जमिनीवर दावा, 103 जणांना पाठवली नोटीस
बेळगावमध्ये नेत्यांना बंदी घालण्यात आली, यावर सामंत म्हणाले की, कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आहे. सीमा प्रश्न सुटु नये, हे काँग्रेसचं काम पण महाराष्ट्राचं सरकार हे सीमाभागातील लोकांसोबत आहे. मराठी नेत्यांना बंदी घातली, असेल तर याचा मी निषेध करतो. राहुल गांधींवर बोलताना सामंत म्हणाले की, ईव्हीएमविरोधी वातावरण निर्माण करण्यापेक्षा जे अपयश आलंय, ते झाकण्याचा हा प्रयत्न आहे. जिंकून आले ते मतदान पण ईव्हीएमवर झालं असल्याचे सामंत म्हणाले आहेत.
राहुल गांधीवर प्रयत्न करुन बघितला तो यशस्वी झाला नाही. म्हणून आता ममता दिदींवर प्रयोग करुन बघत आहेत. काँग्रेसने विचार करावा की, त्यांच्यावर शंका निर्माण होत आहे. सरकार स्थापन झालंय. तीनही नेते मंत्रिमंडळ सांभाळायला सक्षम आहेत. लवकरच विस्तार होईल. हिवाळी अधिवेशनाच्या आधी विस्तार होईल
शिंदे साहेब नाराज नाहीत, असं उदय सामंत यांनी सांगितलं आहे.