Download App

अडीच वर्षांपासून मंत्रीपदाचं जॅकेट घालून बसलेल्या गोगावलेंनी पुन्हा दंड थोपटले…

आता मंत्रीपद दिलं तरीही घेणार नाही, पुढील मंत्रीमंडळात वर्णी लागणार असल्याचं म्हणत आमदार भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा दंड थोपटले आहेत.

Bharat Gogawale : आता मंत्रीपद दिलं तरीही घेणार नाही, पुढील मंत्रीमंडळात वर्णी लागणार असल्याचं म्हणत आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी पुन्हा एकदा दंड थोपटले आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले हे मंत्रिपदासाठी उत्साही होते. मात्र, रायगडमध्ये महायुतीकडून आदिती तटकरे यांना मंत्रिपद देण्यात आलं तर पालकमंत्रिपदी उदय सामंत यांनी वर्णी लागली. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर मंत्रिपद मिळणार असल्याची शक्यता होती, मात्र, दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याचं भरत गोगावलेंनी स्पष्ट केलंय.

महिलांना दोन हजार रुपये, 25 लाखांपर्यंत मोफत उपचार, विधानसभेसाठी काँग्रेसचा जाहीरनामा

भरत गोगावले यांनी बोलताना मंत्रिमंडळ न मिळाल्यावरुन नाराजी व्यक्त केल्याचं दिसून येत आहे. आता पुढील काळात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही कारण अवघे 20 दिवस उरलेले आहेत. येत्या 5 ऑक्टोबरला आचारसंहिता लागणार असून 10 ते 12 नोव्हेंबरला निवडणूका पार पडणार असल्याचं मोठं विधान भरत गोगावले यांनी केलंय. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यांत निवडणूका होणार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुण्यात 26 वर्षीय मुलीचं निधन; कामाला झोकून दिलेल्यांची झोप उडवणारं आईचं पत्र वाचलंत का?

नवीन जॅकेट जुने झाले तरीही मंत्रिपद नाही – उद्धव ठाकरे
तानाजी मालुसरे या वीराच्या भूमीमध्ये झेंडा बाजूला, पण नॅपकिन फडकवणारेच खूप झाले. तसेच त्यांचे दुर्दैव असं की, आज मंत्री होणार, उद्या मंत्री होणार, परवा मंत्री होणार, स्वप्नातले पालकमंत्री, मंत्री पदासाठी नवनवीन जॅकेट शिवली ती देखील जुनी झाली, असल्याची खोचक टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती.

नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात; आयसीयूमध्ये उपचार सुरू, मुलगी निलोफरही घटनेत जखमी

भरत गोगावले मागील अनेक महिन्यांपासून मंत्रिपद मिळून मी रायगडचा पालकमंत्री होईल, असे जगजाहीर सांगत होते. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर त्यांनी अनेकदा भाष्य केले आहे. हे अधिवेशन संपल्यावर मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास मी त्यात असणार आहे. त्याबाबत दुमतच नाही. तर रायगडचा पालकमंत्री ही असेल, असा दावा गोगावलेंकडून करण्यात येत होता. मात्र, उदय सामंत यांनी पालकमंत्रिपदी वर्णी लागली.

दरम्यान, राज्यात ज्यावेळी एकनाथ शिंदे यांचे सरकार सत्तेत आलं त्यावेळेपासून भरत गोगावले यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिल्याचं दिसून येतंय. शिंदेंच्या पहिल्या मंत्रिमंडळात भरत गोगावले यांचं नाव निश्चित असताना काही कारणामुळे त्यांना संधी नाकारली गेली. त्यानंतरही प्रत्येकवेळी भरत गोगावले यांच्या नावाची मंत्रिपदासाठी चर्चा झाली.

follow us