UBT Shivsena on Mahendra Thorve : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनामध्ये वाढ होत आहे. आता भर रस्त्यात एका व्यक्तीला लोखंडी रॉडने (Iron rod) मारहाण करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. या घटनेचा व्हिडिओ समोर आला. यातील मारहाण करणारा व्यक्ती हा शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांचा सुरक्षा रक्षक असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. या घटनेचा व्हिडिओ ठाकरेंच्या शिवसेनेनं (Shiv Sena) ट्वीटरवर पोस्ट केलाय.
BB Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज रंगणार कॅप्टन्सी टास्क; अरबाजवर भारी पडणार का संग्राम?
महाराष्ट्रात गुंडाराज! मिंधेंच्या आमदाराच्या, महेंद्र थोरवे ह्यांच्या ‘शिवा’ नावाच्या बॉडीगार्डने नेरळ येथे भर दिवसा, भर रस्त्यात एका व्यक्तीला मारहाण केली. त्या व्यक्तीची बायका मुलं रडत होती, पण कोणी मदतीला यायची हिम्मत केली नाही…
कायद्याच्या चिंधड्या, लोकांचे हाल!ही फक्त… pic.twitter.com/n0QX7Pp92x
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) September 11, 2024
नेरळमधील हा व्हिडिओ असल्याचे सांगितलं जात आहे. ठाकरे गटाने ‘मिंधे राजवट
पक्त गुंडांसाठीच!’ असा आशय लिहित व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
ठाकरे गटाने काय म्हटलं?
ठाकरे गटाने या घटनेचा व्हिडिओ पोस्ट केला. यात कारमधील व्यक्तीला एक व्यक्ती हातात लोखंडी रॉड घेऊन मारहान करतांना दिसत आहे. ठाकरे गटाने लिहिलं की, महाराष्ट्रात गुंडाराज! मिंधेंच्या आमदाराच्या, महेंद्र थोरवे ह्यांच्या शिवा नावाच्या बॉडीगार्डाने नेरळ येथे भर दिवसा, भर रस्त्यात एका व्यक्तीला मारहाण केली. त्या व्यक्तीची बायकां मुलं रडत होती, पण कोणी मदतीला यायची हिम्मत केली नाही. कायद्याच्या चिंधड्या, लोकांचे हाल! ही फक्त कर्जतची व्यवस्था नाही, राज्यभरात गुंडगिरी वाढलीये. कायदा- सुव्यवस्थेची वाट लागलीये! कारण, गुंडांचा म्होरक्याच बेकायदेशीरपणे मुख्यमंत्रीपदावर बसलाय,असं ठाकरे गटाने म्हटलं.
आमदार थोरवेंनी आरोप फेटाळले…
हे कार्यकर्त्यांमध्ये आपआपसात झालेले मतभेद आहेत. त्याच्याशी माझा संबंध नाही. मारहाण करणारा व्यक्ती माझा अंगरक्षक नाही, ते असंच सांगत असतात. ज्याला मारहाण झाली आणि ज्याने मारहाण केली, ते दोघेही आमच्याच पक्षाचे आहेत. त्यांच्यात आपआपसात मतभेद झालेत. नेमकं काय झालं, याबाबत मला कल्पना नाही. मी दर्शनासाठी आलो होतो, आता जाऊन माहिती घेईन. आम्हाला सत्तेत मस्ती वगैरे नाही, आम्ही आमचं काम करत आहे. ठाकरे गट त्याचं भांडवल करत आहेत, असं थोरवे म्हणाले.