Shinde Vs Thackeray : ठाणे शहरात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या महिला गटात सोमवारी (दि. ०३) रोजी तुफान राडा झाला. त्यात शिंदे गटाच्या महिलांनी ठाकरे गटातील युवती सेनेच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना जबर मारहाण केली. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर ठाण्यातील संपदा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र, अद्याप ठाणे पोलिसांनी साधा गुन्हा दाखल केला नाही. ठाणे पोलीस आयुक्तांच्या निष्क्रियता दिसून येत आहे. ते पक्षपातीपणा करत आहेत. त्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे बुधवारी (दि.५) दुपारी ३ वाजता मोर्चा काढणार आहे. ठाण्यातील शिवाजी मैदान (पश्चिम) येथून मोर्च्याला सुरुवात होणार आहे. ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे.
या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे नेते विक्रांत चव्हाण, शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत, शिवसेना खासदार राजन विचारे हे करणार आहेत.
Uddhav Thackeray फडणवीसांना फडतूस म्हणाले… अन् राज्यात धुरळा उडाला! – Letsupp
मंगळवारी (दि. ४) रोजी रोशनी शिंदे यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राज्यात कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली. राज्याला फडतूस गृहमंत्री मिळाला असल्याची जहरी टीका देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. एवढं मारहाण होऊनही ठाणे पोलीस आयुक्तांनी अद्याप गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे पोलीस आयुक्तांची हकालपट्टी करून सक्षम, कार्यक्षम आयुक्त देण्याची मागणी केली आहे.