Shinde’s candidates MLA status is clear Legislative Councils in Thane and Yavatmal unopposed : राज्यामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीच्या अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस असताना राज्यामध्ये राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. यातच शिंदेंच्या शिवसेनेच्या दोन उमेदवारांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण ठाण्यामध्ये शरद पवारांच्या उमेदवाराने तर यवतमाळमध्ये 3 अपक्षांनी माघार घेतली आहे.
ठाणे अन् यवतमाळमध्ये विधान परिषद बिनविरोध
राज्यामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेंच्या पक्षाला मोठा विजय मिळाला आहे. कारण अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी त्यांच्या पक्षाच्या विरोधातील उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने शिंदेंच्या दोन उमेदवारांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
ब्रेकिंग! बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवायाबद्दल कारवाई; संजय राऊतांचं ट्विट
यामध्ये ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार रविंद्र फटक यांच्या विरोधात उभे असलेले राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार आणि नगरसेवक असलेले अभिजित पवार यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे फाटक यांची निवडणूक बिनविरोध झाली आहे.
दुसरीकडे यवतमाळमध्ये देखील असंच घडलं आहे. या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विरोधात उभे असलेले काँग्रेसचे उमेदवार यांनी काल बुधवारीच माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोद होणार असल्याचं चित्र निर्माण झालं होतं. त्यानंतर आज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी तीन अपक्षांनी माघार घेतल्याने यवतमाळमध्ये देखील शिवसेनेचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांची निवडणूक बिनविरोध झाली आहे.
