Download App

Shital Mhatre : त्यांना सत्तेसाठी भीम शक्तीची आठवण येते… म्हात्रेंचा ठाकरेंना टोला

Shital Mhatre On Udhav Thackery : गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात उद्धव ठाकरेंचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांचा पक्ष वंचित बहुजन आघाडी यांची युती होणार अशा चर्चा सुरू होत्या. तशा त्यांच्या भेटी देखील होत होत्या पण प्रकाश आंबेडकरांच्या या युतीसाठी काही अटी होत्या. त्यांच्या या युतीवरून राज्याच्या राजकारणात चर्चा झाल्या.

मात्र या युतीच्या चर्चांवरून उद्धव ठाकरेंना टीकेची झोड उठवण्यात आली आहे. यामध्ये आता डॅा. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी उद्धव ठाकरेंना डॅा. बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे, याचा विसर पडलाय…इतरवेळी त्यांना मतासाठी, सत्तेसाठी भीम शक्तीची आठवण येते… पण उद्धवजी, ही जनता आहे, सगळं लक्षात ठेवते. अशी टीका शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी ट्विट करत केली होती.

ट्विटमध्ये काय म्हणाल्या म्हात्रे?
‘राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे यांना बहुदा आज महामानव, भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे, याचा विसर पडलाय…इतरवेळी त्यांना मतासाठी, सत्तेसाठी भीम शक्तीची आठवण येते… पण उद्धवजी, ही जनता आहे, सगळं लक्षात ठेवते!! बाकी इमोशनल राजकारण वगैरे चालू दे…’ असं ट्विट करत शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते उद्धन ठाकरे यांच्यवर निशाणा साधला आहे.

शिंदेंच्या आमदाराला जीवे मारण्याची धमकी; निनावी पत्राने एकच खळबळ

तर या अगोदर शिंदेंची पाठराखण करताना शीतल म्हात्रे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला होता. त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या की, ‘राज्याचे मुख्यमंत्री हे शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे अश्रू पुसणारे आहेत. घरातला मासा मेला म्हणून दार बंद करून रडणारे नाहीत. पप्पू परदेशात जाऊन देशाची आणि पंतप्रधानांची बदनामी करतो तर पेंग्विन परराज्यात जाऊन मुख्यमंत्र्यांची बदनामी करतोय. दोघेही एक ही थाली के चट्टे-बट्टे आहेत…’

Tags

follow us