शिंदेंच्या आमदाराला जीवे मारण्याची धमकी; निनावी पत्राने एकच खळबळ

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 15T112327.887

Death Threat to Shivsena MLA Ramesh Bornare :  छत्रपती संभाजीनगर येथील वैजापूर तालुक्याचे आमदार रमेश बोरनारे यांना जीवे मारण्याचे पत्र आले असून या घटनेने सर्व परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ज्यावेळी एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या आमदारांसह सुरत  व गुवाहाटीला गेले होते तेव्हा रमेश बोरनारे हे देखील त्यांच्याबरोबर होते. आता त्यांना मिळालेल्या धमकीच्या पत्रामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.

रमेश बोरनारे यांना हे पत्र अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत येथून आले आहे. त्यांना आलेल्या पत्रावर कर्जत पोस्ट ऑफिसचा शिक्का असल्याचे समोर आले आहे. सध्या राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी निवडणुक लागली आहे. त्यामध्ये वैजापूर तालुक्यातील बाजार समितीची निवडणुक देखील लागली आहे. त्यामुळे शिंदे गट व ठाकरे गट यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष पहायला मिळतो आहे. त्यातच हे पत्र आल्याने पोलिसांनी यांची गांभीर्याने दखल घेतली आहे.

Sanjay Raut : अमित शाह हे महाविकास आघाडीची सभा पाहायला येत आहेत

रमेश बोरनारे यांच्या वैजापूर येथील मुरारी पार्क या ठिकाणी हे पत्र आले आहे. यानंतर रमेश बोरनारे यांचे बंधू संजय बोरणारे यांनी हे पत्र पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या निनावी पत्राची पोलिसांनी लगेचच दखल घेऊन, याबाबत तक्रार दाखल करावी असे त्यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut : कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्षाच्या ठिकऱ्या उडाल्यात

दरम्यान, रमेश बोरनारे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यापासून त्यांच्यात व ठाकरे गटामध्ये अनेकवेळा संघर्ष झालेला पहायला मिळाला आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व चंद्रकांत खैरे यांच्यासोबत अनेकवेळा शाब्दिक चकमक झाल्याचे देखील दिसून आले आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube