Sanjay Jadhav Interview : माझ्या मतदारसंघात ओबीसी विरुद्ध मराठा अशी विभागणी येथे करण्यात आली होती. असं या निवडणुकीत व्हायला नको होत. कारण गेल्या दोन निवडणुकांमध्ये सर्व ओबीसी बांधवांनी मला मोठी साथ दिली. मात्र, यावेळी तसं नव्हत. (Sanjay Jadhav) ओबीसी समाज विरोधात गेला आणि मराठा माझ्यासोबत होता असा थेट खुलासा करत परभणी लोकसभेचे (Parbhani Lok Sabha) महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांनी आपली खंत व्यक्त केली. ते लेट्सअप मराठीच्या “लेट्सअप चर्चा” या कार्यक्रमात बोलत होते.
लेट्सअप स्पेशल : मराठा समाज भाजपला धक्क्याला लावणार?
शेवटच्या टप्प्यात मराठा एकत्र
ओपन विरूद्ध ओबीसी अशी येथे थेट लढत झाली. कुणी काहीही आरोप केले तरी आपण विचार केला तर मराठा समाजाने कायम संयमाची भूमिका घेतली. मात्र, यावेळी ओबीसी बांधवांनी आक्रमकपणा घेतला. तो कधीच नव्हता असं म्हणत संजय जाधव यांनी मराठा सामाजाची बाजू घेतली. तसंच, जानकर यांनी आम्ही माळी, धनगर आणि वंजारी सोबत आहोत. आमचं किती मतदान आहे याची गणित मांडली. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात मराठा एकत्र झाले असंही जाधव यावेळी बोलताना म्हणाले.
एक लाखाने निवडून येईल
मराठा समाजाने आंदोलन उभ केलं म्हणून जातीवाद उभा राहिला का? या प्रश्नावर जाधव म्हणाले, जरांगे पाटील आत्ता आंदोल केलं म्हणून समोर आले. परंतु, सुरुवातीपासूनच जानकर ओबीसी ओबीसी म्हणून राजकारण करत आहेत. तसंच, जरांगे यांच्यामुळे जातीवाद नाही तर महादेव जानकर यांच्यामुळे जातीवाद पुढे आला असा थेट आरोप जाधव यांनी केला. तसंच, काही ठिकाणी ओबीसी मतदार संघात फटका बसला तरी मी एक लाखाच्या पुढे मताधिक्क्याने निवडून येईल असा दावाही जाधव यांनी केला.
माझंही 2019 ला तिकीट कापलं पण मी साथ दिली; लेट्सअप चर्चेत स्मिता वाघ थेट बोलल्या
जानकर यांनी जातीयवादी प्रचार केला
मराठा नेते ओबीसी आणि माझ्या विरोधात उभे आहेत असं जानकर म्हणतात याला उत्तर देताना संजय जाधव म्हणाले, महादेव जानकर यांचा परभणी लोकसभेत काय संबंध असा थेट प्रश्न जाधव यांनी उपस्थित केला. तसंच, तुम्ही विकासाच्या मुद्यावर चर्चा केली असती तर डिपॉजीट जप्त झालं असतं. तुम्ही ही निवडणूक जातीवर लढलात म्हणून काही प्रमाणात मत होतील असा थेट प्रहार जाधव यांनी जानकरांवर केला आहे. तसंच, वारंवार जातीयवादी जानकर बोलत होते जरांगे पाटील तसं कधी बोलले नाहीत असंही जाधव म्हणाले.