Parbhani Loksabha : ‘वंचित’कडून फेरबदल! परभणीत दिला तगडा उमेदवार

Parbhani Loksabha : ‘वंचित’कडून फेरबदल! परभणीत दिला तगडा उमेदवार

Parbhani Loksabha : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) वंचित बहुजन आघाडीकडून 19 उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात उमेदवारांमध्ये अदलाबदली होत असल्याचंही दिसून येत आहे. अशातच आता परभणी लोकसभा मतदारसंघातही वंचितकडून फेरबदल करण्यात आला आहे. बाबासाहेब उगले यांच्याऐवजी आता हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Punjabrao Dakh) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे परभणीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे.

नगरी राजकारण तापलं! विखेंना ताकद देण्यासाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीचा आज मेळावा

वंचित बहुजन आघाडीकडून परभणी लोकसभेसाठी बाबासाहेब उगलेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र अचानक फेरबदल आज वंचितने पंजाबराव डख यांना उमेदवारी देऊन अर्जदेखील दाखल केला आहे.

अमरावतीत मोठा ट्विस्ट! आनंदराज आंबेडकरांची माघारी; वंचित आघाडीला मिळणार बळ

वंचित बहुजन आघाडीकडून आत्तापर्यंत तीन वेळा उमेदवारांमध्ये फेरबदल करण्यात आल्याचं दिसून आलं आहे. राज्यातील 19 मतदारसंघात उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामध्ये तीन उमेदवारांमध्ये बदल करण्यात आले आहेत. रामटेकमध्ये शंकर चहांदेंना उमेदवारी दिली होती मात्र, अचानक माघार घेत काँग्रेसच बंडखोर उमेदवार किशोर गजभिये यांना पाठिंबा देण्यात आला. तर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात सुभाष पवारांना उमेदवारी दिली नंतर अभिजित राठोड यांना उमेदवारी देण्यात आलीयं.

दरम्यान, परभणी मतदारसंघात महायुतीकडून महादेव जानकर हे रिंगणात उभे आहेत तर महाविकास आघाडीकडून संजय जाधव उमेदवार आहेत. आता बाबासाहेब उगलेंऐवजी पंजाबराव डख यांना उमेदवारी दिल्याने ते कसं आव्हान निर्माण करतील हे पाहणं महत्वाचं ठरेल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube