शिवसेना भवन पण एकनाथ शिंदेंना मिळेल, Navneet Rana यांचा दावा

जर उध्दव ठाकरे यांना बाळासाहेबांची विचारधारणा जिवंत ठेवायची असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत यावं, असा सल्ला देत खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी महाशिवरात्रीचा प्रसाद महादेवाने उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना चांगलाच दिला आहे.” अशी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. काल निवडणूक आयोगाने याचा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला दिलं […]

_LetsUpp (6)

navneet rana

जर उध्दव ठाकरे यांना बाळासाहेबांची विचारधारणा जिवंत ठेवायची असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत यावं, असा सल्ला देत खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी महाशिवरात्रीचा प्रसाद महादेवाने उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना चांगलाच दिला आहे.” अशी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

काल निवडणूक आयोगाने याचा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला दिलं आहे. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांची मोठी कोंडी केली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर अनेक प्रश्न तयार झाले आहेत. त्यावर प्रतिक्रया देताना नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

हेही वाचा : उद्धवजी धनुष्यबाण जाऊ द्या… जगनमोहन रेड्डी कडे बघा आणि लढा!

बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना उद्धव ठाकरे यांनी बुडवली. त्यामुळे अजुनही वेळ गेलेली नाही. जर उध्दव ठाकरे यांना बाळासाहेबांची विचारधारणा जिवंत ठेवायची असेल तर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत यावे. असा खोचक सल्लाही राणा यांनी यावेळी दिला.

शिवसेना भवन एकनाथ शिंदे यांना मिळेल

एकनाथ शिंदे यांच्याकडे बहुमत होते आणि ज्यांच्या बाजुने बहुमत होते त्यांच्या बाजुने निर्णय लागला. त्यामुळे येत्या काळात शिवसेना भवन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळणार. असा दावाही नवनीत राणा  यांनी केला आहे.

हेही वाचा : उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाचा आणखी एक झटका.. कसबा-चिंचवड निवडणुकीपुरतीच राहणार मशाल !

Exit mobile version