Download App

सारखीच बडबड…राऊतांना काउंसलिंगची गरज, शिवसेना नेत्या शायना एनसींचा हल्लाबोल

  • Written By: Last Updated:

Shiv Sena leader Shaina NC ON Sanjay Raut : नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देण्यात आलाय. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी (Sanjay Raut) हल्लाबोल केलाय. त्यांना आता शिवसेना (शिंदे गट) नेत्या शायना एनसी यांनी उत्तरं दिलंय.

संजय राऊत नेहमीच बडबड करतात. कदाचित त्यांना काउंसलिंगची आवश्यकता आहे. त्यांच्या बोलण्यातून जलन आणि इर्षेची दुर्गंधी येतेय. राष्ट्र गौरव पुरस्कार आमचे महादजी शिंदे यांनी मराठी क्रांतीकारांची गाथा लिहिली आहे. तोच अवार्ड आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शरद पवारांनी दिला. ते पण अखिल भारतीय साहित्य संमेलनात हा पुरस्कार दिला. त्यांना इतकी आपत्ती आणि त्रास कशासाठी होतोय, असा सवाल देखील शिवसेना नेत्या शायना एनसी यांनी (Shiv Sena leader Shaina NC) विचारला आहे.

आदित्य ठाकरेंची दिल्लीत हुजरेगिरी, आजोबांचं तरी स्मरण ठेवा; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

जेव्हा तुम्ही हिंदू हृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा नाकारली, तेव्हा तुम्हाला काय वाटलं? असा सवाल देखील त्यांनी केलाय. तुम्ही न्याय केला की अन्याय? इकडे तुम्हाला इतकं बोलायची गरज (Maharashtra Politics) नाही. कारण प्रसिद्धीमुळे आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा सन्मान मिळालाय. तिथे कोण कोण होतं? तर डॉ. सदानंद मोरे जे विचारवंत आणि लेखक आहेत. पद्मभूषण राम सुतार आणि स्वत: आदरणीय शरद पवार तेथे उपस्थित होते.

New Income Tax Bill 2025: अर्थमंत्र्यांकडून नवीन आयकर विधेयक सादर, ‘या’ बदलांचा करदात्यांवर होणार थेट परिणाम

तुम्हाला त्रास होतोय कारण, कदाचित कोणी तुम्हाला पुरस्कार देणारच नाही. यावरून समजून जा की, महाराष्ट्राच्या जनतेनं तुम्हाला नाकारलं आहे. जेव्हा कोणाहा हा सन्मान मिळतो. त्यावेळी तुम्हाला हे बघायचं आहे की, हा सन्मान महाराष्ट्रासाठी आहे. आणि जर तुम्हाला इतकाच त्रास होतोय, तर नक्कीच तुम्ही काउंन्सिंग सुरू करा, असा टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

 

follow us