Shivsena 5 Cabinet Ministers : शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन आता एक वर्षाचा काळ होत आला आहे. अशात अद्यापही या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion) झालेला नाही. शिंदे गटासह भाजपमधील (BJP) अनेक नेते मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहत आहेत. अशात खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेनेच्या तब्बल पाच मंत्र्यांना भाजप हटवणार असल्याचा गौप्यस्फोट केला होता. या पाच मंत्र्यांना हटविण्याचा अहवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याकडे भाजपच्या यंत्रणेने पाठल्याचं बोलल्या जातं आहे. (Shiv Sena ministers reject allegations in BJP’s confidential report, Tanaji Sawant says allegations in report are false)
रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच दिल्लीत आले होते. यानंतर शिंदे गटातील 5 मंत्र्यांवर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवून त्यांची बदली करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्रातून मिळालेल्या गोपनीय अहवालाच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. मात्र संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत यांच्यासह पाचही मंत्र्यांनी हे आक्षेप फेटाळून लावले आहेत.
याविषयी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, ‘भाजपने असा कोणताही अहवाल दिलेला नाही. रखडलेल्या विस्तारामुळे ना मुख्यमंत्री नाराज आहेत ना युतीत वाद आहे. काही नेते 15-15 दिवस विश्रांतीसाठी लंडनला जातात. मग 18 तास काम करणारे मुख्यमंत्री आपल्या कुटुंबाला तीन दिवस देऊ शकत नाहीत का?’ असा सवाल त्यांनी केला.
अनिल परबांचा पाय आणखी खोलात! ‘त्या’ प्रकरणात चार्जशीट दाखल; सोमय्यांचा धक्कादायक खुलासा
तर आरोग्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, माझ्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे आहेत. कोरोनाच्या काळात आम्ही शेवटच्या माणसापर्यंत उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. कोणत्याही व्यवहारासाठी कोणाचीही नियुक्ती केलेली नाही. आरोग्य विभागाच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठीच खासगी सचिव, ओएसडी नेमले. आरोग्य विभागातील सुधारणांचा आलेख वाढवण्यासाठी आम्ही काम केले आहे, असे सावंत यांनी सांगितले.
मंत्री कोण होणार हे शिंदे ठरवतील – केसरकर
शिंदे सेनेचे प्रवक्ते शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले, ‘मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्याचे नियोजन अजूनही सुरू आहे. पण निश्चित तारीख सांगता येणार नाही. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. मात्र नवे चेहरे कोण असतील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरवतील, असं केसरकर म्हणाले.
दरम्यान, शिंदेच्या मंत्र्यांना डच्चू देण्यात येईल अशी चर्चा असल्यानं आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.