Download App

शिवसेनेचा खासदार काँग्रेसच्या संपर्कात? कोल्हापुरातील वातावरण तापलं

  • Written By: Last Updated:

आगामी वर्ष हे निवडणुकांचे वर्ष आहे. 2024 मध्ये लोकसभा (Lok Sabha) आणि अनेक राज्यांच्या विधानसभा (Vidhansabha) निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भापजसह कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसने आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. अनेक जागांची चाचपणी राजकीय पक्ष करत आहेत. कोल्हापूर लोकसभेसाठी देखील पक्षांनी चाचपणी सुरू केली. कोल्हापुरचे विद्यमान खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) हे कॉंग्रेसच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, याविषयी मंडलिक यांनी भाष्य केलं. (Shiv Sena MP Sanjay Mandalik in touch with Congress)

सध्या कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापलं आहे. कोल्हापुर लोकसभा जिंकण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून तगड्या उमेदवारांची चाचपणी राजकीय पक्षांकडून सुरू आहे. कॉंग्रेसकडूनही शिवसेना खासदार संजय मंडलिक यांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. गेल्या निवडणुकीत संजय मंडलिक यांना निवडुण आणण्यासाठी कॉंग्रेसने मदत केली. त्यामुळं मंडलिक कॉंग्रेससोबत जातील, या चर्चांना उधाण आलं.

गुंडाला हाताशी धरून नगरमध्ये जागा लुबाडण्याचे षडयंत्र सुरू… 

संजय मंडलिक यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मला कोणत्याही काँग्रेस नेत्याचा फोन आलेला नाही. 2019 च्या निवडणुकीत आमचं ठरलंय म्हणून काही लोकांनी मला मदत केली. मी त्यांची परतफेड केली आहे. आता 2024 च्या निवडणुकीची चर्चा सुरू आहे. राज्य आणि जिल्ह्याच्या राजकारणात 2019 पासून पुलाखालून बरेच पाणी गेले आहे, असं म्हणत भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चांच खंडन केलं.

आपण भाजपकडून निवडणूक लढणार आहात, अशी चर्चा सुरू आहे, असं विचारताच मंडलिक म्हणाले, ‘मी लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार असणार ही दिशाभूल करणारी बातमी आहे. ही पारावरची निरर्थक बडबड आहे. मी भाजपात जाणार या वावड्या उठवल्या जात आहेत, त्याला काही अर्थ नाही. मी शिवसेनेकडूनच निवडणुक लढणार असल्याचं मंडलिक यांनी सांगितलं.

दरम्यान, खासदार मंडलिक यांच्यासाठी भाजपसह कॉंग्रेसही आग्रही आहे. त्यामुळं मंडलिक नेमकी काय भूमिका घेतात? ते कॉंग्रेस सोबत जाणार की शिवसेनेकडूनच लोकसभा लढवणार,  हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us