गुंडाला हाताशी धरून नगरमध्ये जागा लुबाडण्याचे षडयंत्र सुरू…
गुंड प्रवृत्तींच्या लोकांना हाताशी धरून नगर शहरात घरावर तसेच जमिनीवर ताबा मारण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालला आहे हा प्रकार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांनी उघडकीस आणला असून नगर शहरातील नागरिका समवेत असे प्रकार जर त्यांच्या बाबतीत घडले असतील तर उघडपणे सांगावेत असे आव्हान करण्यात आले व शहरामध्ये भुमाफिया गरिबांच्या जागा लुबाडण्याचा प्रयत्न करत असून असा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला होता. (A conspiracy to loot a place in the city by holding hands with the goon…)
परंतु या संपूर्ण प्रकरणाबाबत शिवसेना उद्धव ठाकरे गटांनी अर्धवटच माहिती दिली आहे. प्रत्यक्षात या प्रकरणाच्या खोलात जाऊन माहिती देणे गरजेचे होते असे मत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे म्हणाले की नगर शहरातील काही हस्तक पुण्यामध्ये बसून नगर शहरामध्ये जागा लुबाडण्याचे काम करत आहेत.
नगरकरांसाठी मोठी बातमी! सीना नदीची हद्द निश्चितीची मोहिम पूर्ण
यात पुण्यामधील कुख्यात गुंड शरद मोहोळ याला हाताशी धरून नगर शहरांमध्ये जागा लुबडण्याचा डाव कोण साधत आहे ? असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रतीक बारसे यांनी केला. व शरद मोहोळ हा राज्यातील मोठा गँगस्टर आहे त्याने येरवडा कारागृहात अंडा सेलमध्ये अतिरेकी सिद्धीकीचा गळा आवळून खून केला होता त्यावेळी नगरचा एक नेता खुनाच्या पण अंडा सेल मध्ये होता तिथेच यांची ओळख झाली आणि त्याचाच फायदा नगरचे नेते घेत आहेत कोट्यवधी च आमिष दाखवून मोहोळ याला नगरमध्ये कोण लॉन्च करत आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे सध्या याच्या नावाने शहरात दहशत करून भाजप व राष्ट्रवादी चे गुंड आपली पोळी भाजत आहेत.
सध्या नगर शहरातील नागरिकांना धमकावून जागा बळकवण्याचे षडयंत्र शहरातील भाजप व राष्ट्रवादीचे नेते करीत असल्याचा आरोप व्यक्त केला असून लवकरात लवकर या संपूर्ण प्रकरणाशी निगडित पुरावे सहित पत्रकार परिषद घेण्यात येणार असल्याचे प्रतीक बारसे म्हणाले.