Download App

संजय राऊतांच्या वक्तव्याने शरद पवारांचं टेन्शन वाढणार; श्रीगोंदा विधानसभेच्या जागेवर केला दावा

शिवसेना उबाठा गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊतांनी अहमदनगर जिल्ह्यात एका कार्यक्रमात बोलताना विधानसभा निवडणुकांवर भाष्य केलं.

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut visits Srigonda : लोकसभा निवडणूक झाली आता सगळ्यांना वेध लागले आहे ते म्हणजे विधानसभेचे. यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभेपूर्वीच एक मोठं वक्तव्य केलं आहे. (Sanjay Raut )  श्रीगोंदा येथील जागा शिवसेना उपनेते साजन पाचपुते लढणार आहे. तर अहमदनगर शहर विधानसभेची जागा शिवसेनेचीच असून त्या ठिकाणीही तयारीला लागा असे आदेश राऊत यांनी शिवसैनिकांना दिले. मात्र, महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नसताना राऊत यांनी नगरमध्ये येत थेट जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदार संघांवर दावा केला आहे. (Ahmednagar) यामुळे महाविकास आघाडीमधील इतर घटक पक्षांचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

 

राऊतांनी दिले आदेश पुजा खेडकरच्या आईचं पंकजा मुंडेंच्या कारखान्याशी कनेक्शन इतक्या लाख रुपयांचा दिला होता चेक

शिवसेना उपनेते साजन पाचपुते याच्या श्रीगोंदा शहरातील संपर्क कार्यालयाचं उदघाटन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या शुभहस्ते झालं यावेळी राऊत बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, लोकसभा झाली आता येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुका होणार आहेत. दरम्यान, श्रीगोंदा विधानसभेमधून साजन पाचपुते ही विधानसभेची तयारी करत आहे. त्यांच्या तयारीला राऊत यांनी बळ दिलं.

शहरावर दावा

श्रीगोंदा येथील जागा शिवसेना उपनेते साजन पाचपुते लढणार असल्याचं राऊत यांनी आपल्या भाषणात जाहीर केलं. तसंच अहमदनगर शहर विधानसभेची जागा शिवसेनेचीच असून त्या ठिकाणीही तयारीला लागा. नगर शहर विधानसभा मतदार संघ आपलाच आहे त्यासाठी कामाला लगा उमेदवार नंतर ठरवू असा संदेश खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे.

घटक पक्षांची भूमिका

श्रीगोंद्याची जागा राष्ट्रवादीकडे आहे. तर या ठिकाणाहून राष्ट्रवादीचे राहुल जगताप हे विधानसभेची तयारी करत आहे. तर दुसरीकडे आघाडीमधील घटक पक्षातील ठाकरे गटाकडून साजन पाचपूते हे देखील विधानसभेच्या तयारीत आहे. तर काँग्रेसकडून घनश्याम शेलार हे देखील निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार अशा जोरदार चर्चा रंगल्या आहेत. मात्र, महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नसूनही खासदार संजय राऊत यांनी श्रीगोंद्याच्या जागेवर थेट दावा केला आहे. यामुळे येणाऱ्या काळात महाविकास आघाडी मधील घटक पक्षांमधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीची जागा शिखर बँक घोटाळ्यात क्लीनचीट मिळणं हाच एक घोटाळा; संजय राऊतांचा घणाघात

विधानसभा निवडणुका या येत्या काळात आहे. यातच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या नगर शहरातून राष्ट्रवादीकडून विधानसभेची जोरदार तयारी सुरु आहे. मात्र अहमदनगर शहर विधानसभा ही जागा ठाकरे गटाला सोडण्यात यावी अशी मागणी शिवसैनिक करत आहे. याबाबत सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची देखील भेट घेतली होती. यातच खासदार संजय राऊत यांनी श्रीगोंदा येथे आले असता आपल्या भाषणात या वर भाष्य केलं. नगर शहराची जागा शिवसेनेची आहे. ही जागा शिवसेनेला मिळणार असं थेट वक्तव्य राऊत यांनी केल्याने शिवसैनिक उत्साहात असून आता जोरदार तयारीला लागले आहे. मात्र, राऊतांची या वक्तव्यामुळे शरद पवारांचं टेन्शन मात्र वाढणार आहे हे नक्की.

follow us