Download App

मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी NCP चा उमेदवार ठरला; शिवाजीराव नलावडेंना संधी…

मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी NCP चा उमेदवार ठरलायं. शिवाजीराव नलावडेंना यांना संधी देण्यात आली असून प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंनी त्यांच्या नावाची घोषणा केलीयं.

Image Credit: letsupp

Shivajirao Nalawade : मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा उमेदवार ठरलायं. शिवाजीराव नलावडे (Shivajirao Nalawade) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं असून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी नलावडे यांच्या नावाची घोषणा केलीयं. राष्ट्रवादी काँग्रेसची आज मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत शिवाजीराव नलावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय.

Sukhna Dam: मराठवाड्याला कोरड; सुखना धरणात ठणठणाट, तीस गावांवर पाणीसंकट

शिवाजीराव नलावडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक आणि मुंबई जिल्हाध्यक्ष राहिले असून मुंबई बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. त्यांचे सहकार चळवळीतही योगदान मोलाचे आहे. मुंबई, नाशिक येथील दोन शिक्षक आणि कोकण, मुंबई पदवीधर मतदारसंघातील दोन अशा एकूण चार मतदारसंघांतील निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगानं २४ मे रोजी जाहीर केला होता. या चार मतदारसंघांसाठी २६ जूनला मतदान होणार आहे, तर १ जुलै रोजी मतमोजणी होईल. यापूर्वी ठाकरेंच्या सेनेकडून मुंबई शिक्षक ज. मो. अभ्यंकर आणि पदवीधरसाठी अनिल परब यांना उमेदवारी जाहीर केली होती. निवडणूक आयोगाच्या या नव्या कार्यक्रमामुळं राज्यात पुन्हा एकदा आचारसंहिता लागू होणार असून त्यामुळं अनेक निर्णय रखडण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

प्रियकराचा ‘कार’नामा! गर्लफ्रेंडच्या एक्स बॉयफ्रेंडच्या अंगावरच घातली कार, तरुण जखमी

याआधी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक १० जून रोजी होणार होती. मात्र, राज्य शिक्षक सेनेसह अनेक शिक्षक संघटनांनी शाळा, महाविद्यालयांची उन्हाळी सुट्टी लक्षात घेता ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केल्यानंतर ती पुढे ढकलली होती. मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी भाजप आणि त्याविरोधात महाविकास आघाडीच्या शिवसेना आणि काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू आहे.

दरम्यान, मुंबई पदवीधर मतदार संघातून विलास पोतनीस तर कोकण पदवीधर मतदार संघातून निरंजन डावखरे यांची मुदत 7 जुलै रोजी संपत आहे. तसेच, मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल पाटील आणि नाशिक शिक्षक मतदार संघातून किशोर दराडे यांचीही मुदत संपत आहे. त्यामुळे, येथील 4 जागांसाठी निवडणूक आयोगाकडून विधानपरिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला

follow us

वेब स्टोरीज