प्रियकराचा ‘कार’नामा! गर्लफ्रेंडच्या एक्स बॉयफ्रेंडच्या अंगावरच घातली कार, तरुण जखमी

प्रियकराचा ‘कार’नामा! गर्लफ्रेंडच्या एक्स बॉयफ्रेंडच्या अंगावरच घातली कार, तरुण जखमी

Pune Accident : पुण्यात पोर्शे कार अपघाताचं प्रकरण देशभरात गाजत आहे. या प्रकरणात रोज धक्कादायक खुलासे समोर येत आहे. या घटनेनंतर अपघाताच्या घटना सुरुच आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये एका तरुणाने दुसऱ्या तरुणाच्या अंगावर चारचाकी घातल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याची माहिती आहे. या अपघातात एक युवक जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पिंपरी चिंचवडमधील टेल्को रोड यशवंतनगर भागात ही घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून या प्रकाराचीच चर्चा तोंडोतोंडी आहे.

पुणे अपघात प्रकरणात अटकसत्र सुरूच; ससूनच्या डॉक्टरांनंतर आता शिपायालाही ठोकल्या बेड्या

याबाबत अधिक माहिती अशी की दोन्ही युवकांचे एकाच तरुणीवर प्रेम होते. यातील निलेश शिंदे याच्याबरोबर बिनसल्यानंतर युवतीचे सुशील भास्कर काळे नामक युवकाबरोबर सूत जुळले. त्यानंतर निलेशकडून आपल्याला त्रास दिला जात होता असे या युवतीचे म्हणणे होते. यानंतर एक्स बॉयफ्रेंड नीलेश शिंदे तिला भेटण्यासाठी आला होता. यावेळी दोघे बोलत असताना चारचाकी गाडी घेऊन आलेल्या सुशीलने निलेशच्या अंगावर गाडी घातली. या घटनेत नीलेश गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी सुशील भास्कर काळे याला अटक केली आहे. या पिंपरी चिंचवडमधील टेल्को रोड यशवंतनगर भागात मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून या प्रकाराचीच चर्चा तोंडोतोंडी आहे. पुण्यात रात्रीच्या वेळेस अशा घटना वाढू लागल्या आहेत. नागरिकांनाही याचा त्रास होत आहे. त्यामुळे या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी ठोस पावले उचलावीत अशी मागणी आता होत आहे.

…तर मुख्यमंत्री अजित पवारांचा राजीनामा घेणार का? पुणे कार अपघात प्रकरणात अंजली दमानियांची थेट मागणी

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज