पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 25 रिक्त जागांसाठी भरती, महिन्याला 30 हजार रुपये पगार

  • Written By: Last Updated:
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 25 रिक्त जागांसाठी भरती, महिन्याला 30 हजार रुपये पगार

PCMC Bharti 2024 : सरकारी नोकरीच्या (Govt job) शोधात असलेल्या उमदेवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नुकतीच पिंपरी चिंचवड महानगरपालिकने (Pimpri Chinchwad Municipal Corporation) काही रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. महापालिकेने “समुपदेशक” (Counselor) पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. समुपदेशक पदाच्या एकूण 25 जागा रिक्त भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाते. दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिकेत काम करण्यास इच्छुक असलेले उमेदवार या पदभरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज कसा करायचा, अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता आणि पगार याच विषयी जाणून घेऊ.

Government Schemes : सहकारमित्र इंटर्नशिप योजना सुशिक्षित बेरोजगार योजना आहे तरी काय?

पदाचे नाव – समुपदेशक

पदांची संख्या – ही भरती प्रक्रिया समुपदेशक पदांच्या एकूण 25 रिक्त जागांसाठी आहे.

नोकरीचे ठिकाण – पात्र उमेदवाराचे नोकरीचे ठिकाण पिंपरी चिंचवड असेल.

वयोमर्यादा- या पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे इतकी आहे.

शिक्षण –
– युजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठातून क्लिनिकल किंवा समुपदेशन मानसशास्त्रात नियमित पदव्यूत्तर पदवी. किंवा युजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठातून वैद्यकीय आणि मानसोपचार/ कौटुंबिक आणि बालकल्याण या विषयातील स्पेशलायझेन नियमित MSW
– किशोरवयीन मुलांसोबत काम करण्याचा किमान १ वर्षाचा अनुभव
– शाळा समुपदेशक म्हणून काम करण्याचा किमान १ वर्षाचा अनुभव
भरती संदर्भातील अधिक माहिदी जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.

Gauri Nalawade : गौरी नलावडेच्या हॉट लूकने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष 

अर्ज करण्याची पद्धत – उमदेवार या भरतीसाठी ऑफलाइन माध्यमातून अर्ज करू शकता.

अर्ज पाठवण्याचा पत्ता –
जुना ड प्रभाग कार्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील, मनपा प्राथमिक शाळा, पिंपरीगाव या पत्त्यावर उमेदवारांनी आपला अर्ज पाठवावा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 12 एप्रिल 2024

पगार – “समुपदेशक” पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना 30 हजार रुपये पगार दिला जाईल.

अधिकृत वेबसाइट- https://www.pcmcindia.gov.in/marthi/

अधिसूचना –https://www.pcmcindia.gov.in/admin/cms_upload/jobs/16306208351710569475.pdf

अर्ज कसा करायचा?

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. उमेदवाराने आपल्या अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक पात्रता, पदवी प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, आधार कार्ड, आरक्षण प्रमाणपत्र तसेच अन्य आवश्यक प्रमाणपत्रे जोडावी. उमदेवारांनी अर्जात चुकीची माहिती भरल्यास अर्ज नाकारल्या जाईल, याची नोंद घ्यावी.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज