पिंपरी-चिंचवड महापालिकेत तज्ञ डॉक्टरांच्या 21 जागांची भरती, या तारखेपर्यंत करा अर्ज
PCMC Bharti 2023: जर तुम्ही वैद्यकीय शिक्षण घेतलं असेल आणि उत्तम पगाराच्या नोकरीच्या (Job) शोधात असाल तर तुमच्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेत (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी अंतर्गत फिजिशियन, प्रसूती तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचा तज्ञ, मानसोपचार तज्ञ आणि ईएनटी तज्ञ पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
या भरतीसाठी, उमेदवारांना ऑफलाइन माध्यमातून अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर 2023 आहे. भरतीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा याबद्दल सविस्तर माहिती नोटिफिकेशनध्ये दिली आहे.
पदाचे नाव – फिजिशियन, ऑब्स्टेट्रीशियन आणि गायनॅकॉलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी विशेषज्ञ.
एकूण पदांची संख्या – 21
शैक्षणिक पात्रता –
फिजिशियन – MD मेडिसिन/DNB
प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ – MD/MS Gyn/DGO/DNB
बालरोगतज्ञ – MD Peds/DCH/DNB
नेत्ररोग तज्ज्ञ – MS Ophthalmologist/DOMS
त्वचाशास्त्रज्ञ – MD (skin/VD), DVD, DNB
मानसोपचार तज्ज्ञ – MD psychaiatry/DPM/DNB
ईएनटी विशेषज्ञ – MS EN T/DORL/DNB
वयोमर्यादा – 70 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन.
अर्ज पाठवण्याचा पत्ता –
आवक जावक कक्ष,
वैद्यकीय विभाग, दुसरा मजला,
पिंपरी चिंचवड महानगरपालिका इमारत, पिंपरी – 411018
अर्ज सुरू होण्याची तारीख – 12 ऑक्टोबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑक्टोबर 2023
अधिकृत वेबसाइट – http://www.pcmcindia.gov.in
आवश्यक कागदपत्रे-
10वी परीक्षेची मार्कशीट, रहिवासी प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय परिषदेची नोंदणी किंवा नूतनीकरण प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, जन्मतारीख प्रमाणपत्र आवश्यक आहे
जाहिरात – https://drive.google.com/file/d/1RI7MyzHQDXelZZLCXoOBxfiCh5Afc7K8/view