Download App

‘बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढणाऱ्यांनाच डोक्यावर घेता’; CM शिंदेची जळजळीत टीका

Eknath Shinde Vs Udhav Thackeray : बाळासाहेबांच्या मतदानाचा अधिकार काढणाऱ्यांनाच आज तुम्ही डोक्यावर घेत असल्याची जळजळीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे(Udhav Thackerya) यांच्यावर केली आहे. मुंबईतील आझाद मैदानात आज शिवसेना (शिंदे गटाचा) दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल चढवला आहे.

Marathi Movie : ती येतीय… ‘निळावंती’ चं उत्कंठावर्धक पोस्टर प्रदर्शित

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, बाळासाहेब ज्यांना गाडायची भाषा करायचे त्यांना तुम्ही डोक्यावर गेऊन नाचत आहात. बाळासाहेबांनी ज्यांना, ज्यांना नाकारलं त्यांचे तळवे चाटायचं काम तुम्ही करीत आहात. बाळासाहेबांच्या मतदानाचा अधिकार काढणाऱ्यांनाच आज तुम्ही डोक्यावर घेत आहात, हे कटू सत्य असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

“मनाला पटत नाही तिथे वेळ घालवण्यात अर्थ नाही” : नारायण राणेंच्या पुत्राची राजकारणातून निवृत्ती

‘खोके-खोके’ म्हणणाऱ्यांना सुनावलं :
आम्हाला 50 खोके बोके बोलताहेत, पण आमच्याकडे याच लोकांनी 50 खोक्यांची मागणी केली होती. त्यांना खोके नाहीतर कंटनेर पाहिजे होते, असाही गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

लेट्सअप नवदुर्गा स्पेशल: ‘विशेष’ विद्यार्थ्यांसाठी शाळा चालवणाऱ्या विशाखा नाडकर्णी यांची मुलाखत I

तसेच आम्ही सत्तेवर लाथ मारली, सत्तेची खुर्ची सोडली पण बाळासाहेबांचा विचार सोडला नाही. कुठे बाळासाहेबांचा विचार आणि कुठे सत्तेसाठी लाचारी हे दुर्देव आहे. जिथे बाळासाहेबांचे विचार तिथेचं आमचं शिवतीर्थ आहे. मी दसरा मेळावा शिवतीर्थावर करु शकलो पण राज्यात सुखशांती लाभावी म्हणून नाही केला जिथे बाळासाहेबांचे विचार खुलेआमपणे मांडता येतात तेच आपलं शिवतीर्थ असल्याचंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

तामिळनाडूत BJP ला मोठा धक्का, गंभीर आरोप करत दिग्गज अभिनेत्रीचा रामराम

ज्या काँग्रसेच बाळासाहेबांनी वाभाडे काढले आज त्यांचेच गोडवे गायले जात आहेत. मनिशंकर अय्यरला बाळासाहेबांनी जोडे मारले. आज त्याचं काँग्रेसचे जोडे हे लोकं उचलतात. ज्या काँग्रेसला बाळासाहेबांनी म्हटलं होतं, माझी जेव्हा काँग्रेस होईल तेव्हा माझ दुकान बंद करेन हे बाळासाहेबांचे शब्द होते, असंही ते म्हणाले आहेत.

ज्या शिवतीर्थावरुन गर्व से कहो हम हिंदू है…चा नारा दिला तिथेच आज गर्व से कहो हम समाजवादी ,काँग्रेसी, हिंदुत्व विरोधी है… असा नारा देिला जात आहे. तुम्ही बाळाासाहेबांच्या विचारांना मूठमाती दिलीयं. हिंदुत्वाशी बेईमानी तुम्ही केली, काँग्रेस एमआयएम कोणा कोणाला डोक्यावर खाद्यांवर घेतलं, उद्या हमास, दहशतवादी लष्कर ए तोयबा संघटनेशी गळाभेट घेतील, अशीही खोचक टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे.

Tags

follow us