शिंदेंचे किती आमदार परतणार? राऊतांनी थेट आकडाच सांगितला

Sanjay Raut On Shivsena Shinde MLA : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. शिंदे गटामध्ये मंत्रीपदावरुन धुसफूस सुरु असल्याची चर्चा आहे. अशातच काही आमदार हे ठाकरे गटाकडे परतणरा असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदरांविषयी भाष्य केले […]

Letsupp Image   2023 07 06T125927.755

Letsupp Image 2023 07 06T125927.755

Sanjay Raut On Shivsena Shinde MLA : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. शिंदे गटामध्ये मंत्रीपदावरुन धुसफूस सुरु असल्याची चर्चा आहे. अशातच काही आमदार हे ठाकरे गटाकडे परतणरा असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदरांविषयी भाष्य केले आहे. यावेळी ते लोकशाही या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे गट पुन्हा ठाकरेंकडे जाणार का अशी चर्चा सुरु झाली आहे. अशातच शिंदेंचे मंत्री शंभूराज देसाई यांनी ठाकरेंनी आम्हाला साद घालावी मग आम्ही विचार करु, असे वक्तव्य केले होते. त्यावर राऊतांनी जोरदार उत्तर दिले आहे. ठाकरेंनी तुम्हाला साद घालायला तुम्ही काय ठाकरेंचे बाप आहात का, असे म्हणत त्यांनी शिंदे गटाला सुनावले आहे.

NCP : तुम्हाला काय कमी केलं होतं? मिळालेली पदं सांगत रोहित पवारांचा वळसे पाटलांना सवाल

राऊत म्हणाले की, शेण कोणी खाल्लं, पलायन कोणी केलं, हे लोक काही बोलतात. या लोकांना जर आम्ही परत घेतलं तर महाराष्ट्राची जनता आमच्यावर खवळेल. या लोकांविषयी महाराष्ट्राच चीड आहे, असे राऊत म्हणाले. तसेच यातील बहुसंख्य आमदार हे आमच्याकडे निरोप पाठवतात. गेल्या दोन महिन्यांपासून शिंदे गटामध्ये अस्वस्थता सुरु असून मागच्या आठ दिवसांमध्ये ती अधिक वाढली आहे.

NCP : साहेबांनंतर आता दादांनीही दंड थोपटले, दिलीप वळसे-पाटलांसाठी बनले ढाल…

आमची घोर चूक झाली, आम्हाला माफ करा, आमच्यावरील कारवाई थांबवा असे निरोप शिंदे गटाकडून येत आहे. जवळपास 20 आमदार आमच्या संपर्कात आहे. 10 ते 12 आमदारांनी माझ्याशी संपर्क केला आहे. त्यांच्यासमोर जागावाटपाचा मोठा प्रश्न आहे. अजितदादांनी काल 90 जागा लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिंदे गटात मोठी अस्वस्थता तयार झाल्याचे राऊतांनी म्हटले आहे.

Exit mobile version