Deepak Kesarkar On Aaditya Thackeray : शिवसेनेच्या शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. दीपक केसरकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अयोध्या दौऱ्यावर गेले होते. आदित्य ठाकरे यांनी शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन टीका केली आहे. राज्यामध्ये अवकाळी पाऊस झाला असून सरकारचे त्याकडे लक्ष नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याला आता केसकरांनी जोरदार उत्तर दिले आहे.
अवकाळी नुकसान झालेल्या भागाचा आदित्य ठाकरे व उद्धव ठाकरे हे दौरा करणार आहेत. यावरुन केसरकरांनी ठाकरेंवर टीका केली आहे. ही सर्व नाटकं आहेत. ज्या वेळेला जनतेला काही तरी देऊ शकत होते, त्यावेळी घरात बसून काम केले. आम्ही शेतकऱ्यांना जे देत आहोत त्याचं श्रेय ते घेत असतील तर त्यांना बाळासाहेबांचं नाव लावयाचा काही अधिकार नाही, अशा शब्दात त्यांनी ठाकरे पिता-पुत्रांवर तोफ डागली आहे.
रावणाला शिवधनुष्य पेललं नाही, यांना काय पेलवणार? भास्कर जाधवांची अयोध्यावारीवर टीका
बाळासाहेब हे रोखठोक होते. ते कधीही खोटे बोलत नव्हते. खोट कसं बोलावं याच उत्कृष्ट नमुना आदित्य ठाकरे आहेत. हे मी अत्यंत जबाबदारीने बोलत आहे. एवढा खोटं बोलणारा युवक मी पाहिला नाही. आदित्य ठाकरे हे मुंबईचे पालकमंत्री असताना त्यांच्याच काळामध्ये 1 हजार कोटींचे स्टुडीओ सीआरझेडमध्ये बांधण्यात आले. त्याच्यावर आता कारवाई होत आहे. फक्त वृक्षप्रेम दाखवायचे आणि मेट्रोचे काम रोखायचे त्यामुळे मुंबईत प्रदुषण वाढले आहे, असे म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सोडवण्यासाठी योगी स्वत: सरसावले…
तसचे तुमच्या मनामध्ये रावण आहे म्हणून तुमच्या तोंडामध्ये रावण येतो. तुम्ही लहाणपणापासून खोक्यांसोबत खेळत मोठे झालात म्हणून तुम्ही तुमच्या तोंडातसारखे खोके-खोके येते, असा घणाघात केसरकरांनी आदित्य ठाकरेंवर केला आहे.