Download App

राष्ट्रवादीचा वजीर 40 आमदारांसह गायब होणार होता; शिंदे गटातील नेत्याचा गौप्यस्फोट

Mahesh Shinde On Ajit Pawar :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर त्यांच्या पक्षामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उद्या पाच मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कमिटीची बैठक होणार असून त्यामध्ये पुढील बाबी निश्चित केल्या जाणार आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

या सर्व घडामोडींमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी आपल्या बोलण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना नाव न घेता लक्ष केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधील वजीर 40 आमदारांसह गायब होणार होता. त्यामुळे शरद पवारांना पक्ष टिकवण्यासाठी या गोष्टी कराव्या लागत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

अंबादास दानवे म्हणाले, शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर संपूर्ण राष्ट्रवादीत एकजूट…

शरद पवार हुशार आहेत त्यांना कळलं होतं की वजीर निघून चालला आहे. त्यामुळे अख्खा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर होता. थोड्या दिवसांनी हे होणारच आहे. त्यामुळे हा प्रश्न नाही, पण शरद पवारांना पक्ष टिकवण्यासाठी या सर्व गोष्टी कराव्या लागत आहेत, असे महेश शिंदे यांनी म्हटले आहे.

अंबादास दानवे म्हणाले, शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर संपूर्ण राष्ट्रवादीत एकजूट…

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील या विषयावर भाष्य केले आहे. अजित पवार हे आपला गट घेऊन भाजपमध्ये येणार आहेत, असा प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारण्यता आला होता. त्यावर आता त्यांनी उत्तर दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही नेता आमच्या संपर्कात नाही. पण जर कोणी आमच्या पक्षात येत असेल तर आमचा झेंडा व दुपट्टा तयार आहे, असे ते म्हणाले आहेत. त्यामुळे आता खरंच कोणी मोठा नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us