Download App

Sanjay Raut : ‘नार्वेकर कायदा मानत नाही, त्यांचं स्वतःचं पर्सनल लॉ’; राऊतांचा खोचक टोला

Sanjay Raut : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात काल सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. यानंतर विरोधकांनी राहुल नार्वेकर यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही नार्वेकरांवर सडकून टीका केली. राहुल नार्वेकर कायदा मानत नाहीत त्यांचं स्वतःच पर्सनल लॉ आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत नेहमीप्रमाणे भाजप आणि राज्य सरकारवर टीका केली. राहुल नार्वेकरांवरही निशाणा साधला. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिला आहे तो हा लवाद पालन करत असेल. लवाद हा न्यायालयापेक्षा मोठा नाही. तुम्ही त्यांच्या हाताखाली काम करत आहात. सार्वभौमत्व म्हणजे काय चोरांना संरक्षण देणं, चोरांच्या राजकीय सरदारांना संरक्षण देणे म्हणजे विधिमंडळाचा किंवा संसदेचे सार्वभौमत्व नाही.

‘देशात मोदी-शहांचा पर्सनल लॉ, अध्यक्षांच्या हाती मात्र तुणतुणे; ठाकरे गटाचा हल्लाबोल

नार्वेकर कायदा मानत नाही, त्यांचं स्वतःचं पर्सनल लॉ

राहुल नार्वेकर हे सर्वोच्च न्यायालयाचा कायदा मानत नाहीत, स्वतःच्या कायद्याच्या पुस्तकातला मानत नाहीत, ते स्वतःचा पर्सनल लॉ मानतात. पण, पर्सनल लॉ वर कायदा चालत नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं असे राऊत म्हणाले. जे आम्ही सांगतोय तेच सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. यांच्या डोक्यावर लोहाराचे हातोडे पडून देखील त्यांचे डोके ठिकाणावर येत नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा सांगितले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने काल एक निकाल दिला. समलिंगी विवाहाला मान्यता नाही. तोच निर्णय या तीन समलिंगींना लागू होतो. त्यांचं सरकार हे त्याच पद्धतीचं सरकार आहे. जे या महाराष्ट्राला आणि समाजाला मान्य नाही. दोन गद्दरांचे गट एकत्र आले, तिसऱ्याने त्यांच्याशी विवाह केला आणि आता ते म्हणतील तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र नव्हता का? आम्ही मूळ पक्ष एकत्र आलो आहोत आणि सरकार स्थापन केलं. हे तीन समलिंगी एकत्र आले आहेत आणि सत्ता स्थापन केली आहे, अशी खोचक टीका राऊत यांनी केली.

मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं गेलं; अटकेनंतर ललित पाटीलच्या दाव्यानं खळबळ

Tags

follow us