Download App

Sanjay Raut : ‘आता ईडी काय करणार?’ ‘फडणवीस काय करणार?’; राऊतांचे खोचक सवाल

Sanjay Raut on Ajit Pawar : माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर  त्यांचे नाव न घेता पोलीस दलाच्या जमीन विक्रीचे गंभीर आरोप केले आहेत. बोरवणकर यांच्या मॅडम कमिश्नर या पुस्तकातून त्यांनी हे आरोप केले आहेत. या आरोपांची राजकारणात जोरदार चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली.

राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. तसेच पोलीस दलाच्या जमिनींसंदर्भात अजित पवार यांच्यावर होत असलेल्या आरोपांवरही भाष्य केले. राऊत म्हणाले, आता ईडी काय करणार? आता देवेंद्र फडणीस काय करणार? आर्थिक गुन्हे शाखा काय करणार? याबाबत आम्हाला प्रश्न विचारला जात आहे. मात्र, हा प्रश्न सरकारला आणि भाजप नेत्यांना विचारला गेला पाहिजे. त्यांना विचारलं पाहिजे की त्यांनी कोणत्या व्यक्तीला आपल्य सोबत बसवलं आहे, कोणत्या मदतीने सरकार बनवले आहे .

“पालकमंत्र्यांना ‘ते’ अधिकारच नाहीत!” बोरवणकरांच्या गंभीर आरोपांवर अजितदादांचे प्रत्युत्तर

सरकारी जमीन हडपत आहे, हे भ्रष्टाचारी आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांचे 40 चोर असो, त्यांनी कुणाबरोबर राज्यात सरकार बनवलं आहे. एका ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने कशाप्रकारे सरकारी जमिनी हडप करण्याचा प्रयत्न केला जात होतो हे सांगतिलं आहे. त्याच लोकांना फडणवीस खांद्यावर घेऊन मिरवत आहेत, अशी खोचक टीका राऊत यांनी केली.

नेमकं काय आहे प्रकरण?

बोरवणकर यांच्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकातून अजित पवार यांच्यावर पोलिस दलाच्या जमीन विक्रीचे आरोप केले आहेत. बोरवणकर यांनी कुठेही थेट अजित पवार यांचे नाव घेतले नसले तरी त्या 2010 च्या दरम्यान पुण्याच्या पोलीस आयुक्त होत्या आणि त्यांनी ‘पालकमंत्री दादा’ असा उल्लेख केला आहे. या दरम्यान पुण्याचे पालकमंत्री अजित पवार होते. त्यामुळे ते ‘दादा’ म्हणजे अजित पवारच असल्याचे सांगितले जात आहे.

‘अन्’ चिडलेल्या अजितदादांनी नकाशा फेकला… : माजी IPS मीरा बोरवणकर यांचे गंभीर आरोप

Tags

follow us