Download App

Sanjay Raut : ‘हा तर डुप्लीकेट लोकांचा डुप्लीकेट मेळावा’; राऊतांचा शिंदेंना खोचक टोला

Sanjay Raut : आज विजयादशमीनिमित्त राज्यातील राजकारण ढवळून निघणार आहे. उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाचे दोन स्वतंत्र मेळावे होत आहेत. त्यातच शिंदे गटाच्या मेळाव्यावरून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घणाघाती टीका केली आहे. आम्ही शिवसेनेचे मालक नाही तर विश्वस्त आहोत. हात पसरवून बाळासाहेबांच्या बरोबर फोटो लागले आहेत त्यांचे. पोटात कळ आल्यासारखा चेहरा केलाय फोटोत अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) टीका केली. राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात गाजत असलेलं ड्रग्ज प्रकरण आणि शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावर जोरदार टीका केली.

मराठा आरक्षण आंदोलन तापणार? शिंदे समितीला शासनाकडून ‘दोन’ महिन्यांची मुदतवाढ

ते पुढे म्हणाले, शिवसेनेचा एकच दसरा मेळावा आहे. इतर मेळावे होत असतात. बाटगा जरा मोठ्याने बांग देत असतो. नपुंसक जास्त कांदे खात असतो. हात पसरवून बाळासाहेबांच्या फोटो बरोबर फोटो लागलेत त्यांचे. पोटात कळ आल्यासारखा चेहरा केलाय फोटोत. बाळासाहेबांबरोबर असे फोटो लावण्याची आमची किंवा उद्धव ठाकरेंची कधीच हिंमत झाली नाही. आम्ही काही शिवसेनेचे मालक नाही तर विश्वस्त आहोत. हात पसरवून तुम्ही फडफड दाखवलीत, ती शेवटची आहे. तुमचा पुढचा दसरा मेळावा होणार नाही. तु्म्ही डुप्लीकेट लोक आहात. हा डुप्लीकेट मेळावा आहे, असा टोला राऊत यांनी लगावला.

2024 मध्ये तुमचा दसरा मेळावा होणारच नाही 

रावण हा अहंकारी होता आणि त्याचा नाश अहंकारानेच झाला. आज दसरा मेळावा त्या रावणाचा आज अहंकाराचा नाश केल्याशिवाय राहणार नाही. 2024 साली दसरा मेळाव्यात शिवसेनेचे राज्यकर्ते बसले असतील दिल्लीतील आणि महाराष्ट्रतील. त्यामुळे तुमचा पुढील दसरा मेळावा होणार नाही, असे राऊत यांनी शिंदे गटाला ठणकावले.

आगामी निवडणुकीत भावना भडकवल्या जाणार, सरसंघचालकांचं जनतेला आवाहन

मोहन भागवतांना पुस्तक पाठवणार 

मोहन भागवत लोकशाही मानत नाहीत का? या देशात भिन्न विचाराचे लोक येऊ नये का? सरसंघचालक यांना आम्ही लोकशाहीचे संरक्षक मानतो. या देशात भिन्न विचाराचे लोकांनी एकत्र येऊ नये का? मी मोहन भागवत यांना एक सांगू इच्छितो की बाळासाहेब देवरस सरसंघचालक हे आणीबाणीच्या काळात तुरुंगात होते आणि तेव्हा देखील भिन्न विचारांचे लोक एकत्र आले. तेव्हा भारतीय जनता पक्ष देखील होता. तेव्हा भिन्न विचार जे लोक एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाची स्थापना केली आणि त्यांनी हुकूमशाहीचा पराभव केला. मोहन भागवत यांना हे सांगण्याची गरज नाही. बहुदा त्यांना इतिहास माहीत असावा. लालकृष्ण अडवाणी आणीबाणीच्या काळात तुरुंगात होते. त्यांनी त्यांच्या पुस्तकात सर्व घटनांचा उल्लेख केलेला आहे. ते पुस्तक मी मोहन भागवत यांना पाठणार असल्याचे राऊत म्हणाले.

Tags

follow us