Download App

Sanjay Raut : ‘मग, ‘तो’ व्हिडिओ खोटा आहे का?’ राऊतांचा फडणवीसांना थेट सवाल

Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओत भाजप नेता पोलीस उपायुक्तांना धक्काबुक्की करताना दिसत आहे. या व्हिडिओवरून राजकारणाचा पारा चढला आहे. सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. अशा परिस्थितीत आता खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे. राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत फडणवीस यांना थेट सवाल विचारला आहे.

राऊत म्हणाले, नागपूरमध्ये जे घडलंय, ते स्पष्ट दिसतंय. तो व्हिडिओ खोटा आहे का? पोलीस अधिकाऱ्यांना धक्काबुक्की झाली आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या देवगिरी बंगल्याच्या आवारात हे घडलंय. व्हिडिओ खोटा असेल तर सांगा आधी. कोणत्या गुन्हेगाराला तुम्ही वाचवताय? छातीवर कमळ लावलं आणि त्यानं हत्या केली तर तो महात्मा होतो का?, असा सवाल राऊत यांनी केला.

करोडपती झेंडेंचे निलंबन; भाजपच्या पदाधिकाऱ्याने फडणवीसांना लिहिलेलं ‘ते’ पत्र कारणीभूत?

व्हिडिओत नेमकं काय ?

खासदार राऊत यांनी आज सकाळी पोस्टसह व्हिडिओ ट्विट केला. या पोस्टमध्ये त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. हे चित्र महाराष्ट्राची दुर्दशा दाखवणारं आहे. मुक्काम पोस्ट – नागपूर. उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांचे देवगिरी निवासस्थान. पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी भाजप युवा शहरप्रमुख पुष्कर पोशेट्टीव याने उघड धक्काबुक्की केली. खाकी वर्दीच्या कॉलरला हात घातला. स्पष्ट दिसत आहे. महाराष्ट्र इतका हतबल आणि लाचार कधीच झाला नव्हता, असे राऊत यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

राहुल नार्वेकरांवर टीकास्त्र

संजय राऊत यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरही सडकून टीका केली. जे आम्ही सांगतोय तेच सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. यांच्या डोक्यावर लोहाराचे हातोडे पडून देखील त्यांचे डोके ठिकाणावर येत नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने काल एक निकाल दिला. समलिंगी विवाहाला मान्यता नाही. तोच निर्णय या तीन समलिंगींना लागू होतो. त्यांचं सरकार हे त्याच पद्धतीचं सरकार आहे. जे या महाराष्ट्राला आणि समाजाला मान्य नाही. दोन गद्दरांचे गट एकत्र आले, तिसऱ्याने त्यांच्याशी विवाह केला आणि आता ते म्हणतील तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र नव्हता का? आम्ही मूळ पक्ष एकत्र आलो आहोत आणि सरकार स्थापन केलं. हे तीन समलिंगी एकत्र आले आहेत आणि सत्ता स्थापन केली आहे, अशी खोचक टीका राऊत यांनी केली.

Lalit Patil Arrested : …अशी मुलं असण्यापेक्षा मेलेले बरे…’ ललित पाटीलच्या आई-वडीलांना अश्रु अनावर

Tags

follow us