Sanjay Raut: ही दोन पक्षाची युती नसून शिवशक्ती आणि भीमशक्तीची युती’, संजय राऊतांच सूचक वक्तव्यं

मुंबई:  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीची युतीची अधिकृतपणे घोषणा करण्यात येणार आहे. या युतीवर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी भाष्य केलं आहे. महाराष्ट्र नाही तर देशाच्या राजकारणातला हे क्रांतिकारक पाऊल असणार आहे. हे दोन पक्षाचे युती नसून शिवशक्ती […]

_LetsUpp

_LetsUpp

मुंबई:  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीची युतीची अधिकृतपणे घोषणा करण्यात येणार आहे. या युतीवर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी भाष्य केलं आहे. महाराष्ट्र नाही तर देशाच्या राजकारणातला हे क्रांतिकारक पाऊल असणार आहे. हे दोन पक्षाचे युती नसून शिवशक्ती आणि भीमशक्ती ची युती आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे जुने स्वप्न होतं कुणाला वाटत असेल की, आमच्या मागे महाशक्ती आहे. सरकार ज्यांनी बनवलं आहे. त्यांना असं वाटत असेल, परंतु आंबेडकर आणि ठाकरे हे दोन शक्ती एकत्र येऊन जी शक्ती तयार होईल ती महाशक्ती असणार आहे.

या महाशक्तीसमोर कुणाचा टिकाव लागणार नाही. महाविकास आघाडी या निमित्ताने अधिक बळकट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात क्रांतिकारक घटना घडणार आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये युतीची घोषणा होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे क्रांतीकारक पाऊल असणार आहे. बाबासाहेबांचे नातू आणि प्रबोधनकार ठाकरेंचे नातू परत एकदा एकत्र दिसणार आहेत. ही तर सुरुवात आहे. आता महाराष्ट्रात अजून बरंच काही घडणार आहे, असं सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी यावेळी केले आहे.

ही दोन पक्षाची युती नाही. तर शिवशक्ती-भीमशक्तीची युती असणार आहे. ही विचारांची युती आहे. दोघांची ताकद महाराष्ट्राबाहेर देखील आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं हे स्वप्न होतं. दोन्ही विचारधारा एकत्र यावे. कुणाला वाटत असेल आमच्यामागे महाशक्ती आहे, आम्हाला महाशक्तीचा पाठिंबा आहे. पण त्यात काही तथ्य नाही. ठाकरे- आंबेडकर एकत्र आल्यावर ती खरी महाशक्ती असणार आहे. या महाशक्तीसमोर कुणाचा देखील टिकाव लागणार नाही. या महाशक्तीमुळे आघाडी अधिक मजबूत होणार आहे, असे संजय राऊत यावेळी म्हणाले आहेत.

Exit mobile version