Download App

Sanjay Raut : ‘फडणवीस पुन्हा येत असतील तर स्वागतच करू’; राऊतांचा खोचक टोला

Sanjay Raut on BJP Viral Video : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ राज्यात ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांसमोर आमदार अपात्रता सुनावणी सुरू आहे. या घडामोडीतच प्रदेश भाजपकडून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन, अशा आशयाचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. मात्र काही वेळातच हा व्हिडिओ डिलीट करण्यात आला. या प्रकारावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असतानाच आता खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही फडणवीसांना खोचक टोला लगावला आहे.

राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यातील भाजप नेतृत्वावर घणाघाती टीका केली.राऊत म्हणाले, त्यांच्या मी पुन्हा येईलचं आम्ही सध्या स्वागत करतो. कारण ते कायदेशीर सरकार असेल आम्ही कायदा आणि घटना मानणारी लोकं आहोत. जर ते कायदेशीर आणि घटनात्मक मार्गाने येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करू. या राज्यात बेकायदेशीर मुख्यमंत्री बसलेले आहेत. तेच बेकायदेशीर आदेश पोलीस आणि यंत्रणा पाळते आहे. हे अत्यंत चुकीच आहे. एक तात्पुरती व्यवस्था म्हणून कायदेशीर मुख्यमंत्री येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत नक्कीच करू. देवेंद्र फडणवीस यांची मला दया येते. सातत्याने गेल्या पाच वर्षापासून मी पुन्हा येईन, असं सांगत आहेत. पण त्यांना पुन्हा घ्यायची संधी मिळत नाही. फौजदाराचा हवालदार केला जातो आणि त्यांना आणलं जातं. एक बेकायदेशीर मुख्यमंत्री त्यांच्या छातीवर बसवले जातात, अशी टीका राऊत यांनी केली.

Manoj Jarange चौथ्या दिवशीही उपोषणावर ठाम; विशेष अधिवेशन बोलावण्याची केली मागणी

शिवसेनेपासून फारकत घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शिंदे गटाकडे ४० तर भाजपचे १०५ आमदार होते. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा स्वीकारली होती. यामुळे भाजपचे अनेक नेते नाराज झाले होते. काल अचानक भाजपने फडणवीस यांचा व्हिडिओ ट्विट केला. यात फडणवीस मी पुन्हा येईनचा नारा देत आहेत. फडणवीस यांच्या व्हिडिओनंतर राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

ट्वीटमध्ये नेमकं काय होतं?

नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईल, असं कॅप्शन देत भाजपने एक व्हिडिओ ट्वीट केला होता. मी पुन्हा येईन… नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी, मी पुन्हा येईन… गावांना जलयुक्त करण्यासाठी, मी पुन्हा येईन… शहरांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी, माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी…. असं फडणवीस या व्हिडिओत म्हणतांना दिसत आहेत.

थोरल्या पवारांवर टीका, पण धाकट्या पवारांच्या घोटाळ्याचा उल्लेखही नाही; ठाकरेंची मोदींवर टीका

नेत्यांच्या बदनामीसाठीच शिंदे-अजितदादांना फोडलं

अजित पवार एकनाथ शिंदे यांना यासाठीच पक्षातून फोडलेलं आहे की त्यांच्या नेत्यांची बदनामी करावी. अजित पवार शरद पवारांच्या बदनामीचं वक्तव्य थंड डोक्याने ऐकत होते. याचा अर्थ त्यांचा स्वाभिमान मेलेला आहे. जेव्हा पवारांना पद्मविभूषण दिला होता. तेव्हा या लोकांनी भांग प्यायली होती का? असा सवाल राऊत यांनी विचारला. पवारांनी केलेल्या कामापैकी एक टक्का तरी काम त्यांनी करावं आणि मग पवारांवर टीका करावी. काही वर्षांपूर्वी हेच नरेंद्र मोदी बारामतीत येऊन शरद पवार माझे राजकीय गुरू आहेत. त्यांचं बोट धरून मी राजकारणात कसा आलो? हे बोलत होते. ते मराठा समाजाच्या आंदोलनावर बोलले नाहीत, शेतकरी आत्महत्यांवर बोलले नाहीत, ते फक्त शरद पवार यांच्यावर बोलले. ज्या पवारांचा सन्मान या देशाने आणि राज्याने केला. ही एक विकृती आहे आणि या विकृतीचा अंत 2024 साली होईल, असा इशारा राऊत यांनी दिला.

Tags

follow us