Download App

Sanjay Raut : ‘अजितदादा अन् भाजपलाच सांगा’; राऊतांचा बावनकुळेंना खोचक टोला

Sanjay Raut : देशातील पाच राज्यांचे निवडणूक निकाल (MP Election 2023) लागले. या पाचपैकी तीन राज्यातील सर्वच एक्झिट पोलचे (Election Results 2023) अंदाज ध्वस्त करत भाजपने महाविजय साकारला. राजस्थान आणि छत्तीसगडच्या सत्तेतून काँग्रेसला बेदखल केलं तर मध्य प्रदेशातील सत्ता कायम राखली. या मोठ्या विजयानंतर भाजप नेत्यांचाही आत्मविश्वास वाढला आहे. या आत्मविश्वासाच्या भरातच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. Shivsena MP Sanjay Raut replies to Chandrashekhar Bawankule on his statement Devendra Fadnavis will be the Chief Minister)

राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दिल्लीत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीची माहिती दिली. राऊत म्हणाले, उद्या दिल्लीत मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीसाठी उद्धव ठाकरे उद्या दिल्लीत येत आहेत. अखिलेश यादव नाराज आहेत हे मी वाचलं. नितीश कुमार यांची प्रकृती खरंच बिघडली आहे. ममता नाराज असल्याचं मी ऐकलं. पण आमच्या मित्रपक्षांचे गैरसमज लवकर दूर होतील. काँग्रेसची भूमिका काय असावी यावर चर्चा होईल.

Chandrashekhar Bawankule : ‘युती तोडण्याचं कारस्थान केलं, त्याचंच हे फळ’ बावनकुळेंनी राऊतांना सुनावलं

यानंतर पत्रकारांनी त्यांना बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारले. त्यावर राऊत यांनी खोचक टोला लगावला. बावनकुळे यांनी हे अजित पवार आणि भाजपला सांगायला हवं. हे लग्न तिघात झालं आहे ते टिकत नसतं. हे दोघांत व्हायला पाहिजे होतं. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र होतो. भाजप ज्यावेळी राज्यात काहीच नव्हता तेव्हा त्यांना खांद्यावर घेऊन शिवसेनेनं गावागावात पोहोचविलं. भाजप सुजला, फुगला, मोठा झाला हे कुणामुळं हे सगळ्यांना माहिती आहे, असे राऊत म्हणाले.

काय म्हणाले होते बावनकुळे ?

2024 मध्ये वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्रिपदाची पुन्हा एकदा कोण शपथ घेणार? असाही प्रश्न कार्यकर्त्यांना विचारला. यावेळी कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, अशी घोषणा केली.  राज्यात फडणवीस नावाचा एकच वाघ असून, दुसरा कुणी वाघ होऊ शकत नसल्याचे ते म्हणाले. येत्या मे महिन्यात देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेतील. त्यासाठी महाराष्ट्रातून 45 खासदार निवडून पाठवायचे असून भंडाऱ्यातील खासदार हा सर्वाधिक मतांनी निवडून पाठवायचे आहेत त्यासाठी कामाला लागा अशा सूचना त्यांनी उपस्थितांना दिल्या. वानखेडे स्टेडियमवर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यासाठी आपण सर्वांनी ताकद लावायची असल्याचेही ते म्हणाले होते.

देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री? भाजपच्या ट्वीटमुळे राज्यात नवा भूकंप ?

Tags

follow us