Download App

CM शिंदेंच्या पत्रकार परिषदेला जाणार? राऊत म्हणाले, जर पोलिसांनी…

Sanjay Raut : औरंगाबादमध्ये उद्या (दि. 16) मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून, नेते मंडळींसाठी थोड्या थोडक्या नव्हे तर, तब्बल 140 रूम्स बुक करण्यात आल्या आहेत. या बैठकीची जय्यत तयारी केली जात आहे. विरोधकांचंही या बैठकीकडे लक्ष आहेच. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर लगेचच ही बैठक होत आहे. त्यामुळे ही बैठक चर्चेत आली आहे. या बैठकीच्या अनुषंगाने विरोधकांकडून आरोप केले जात होते. आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

राऊत म्हणाले, छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्यापूर्वी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला जाण्याची परवानगी पोलिसांनी दिली तर आपण स्वतः पत्रकार म्हणून तेथे जाऊ आणि मुख्यमंत्री शिंदे यांना प्रश्न विचारू असे राऊत म्हणाले. राऊत (Sanjay Raut) यांच्या या वक्तव्यानंतर शिंदे सरकारच्या कॅबिनेट बैठकीपाठोपाठ आता पत्रकार परिषदही चर्चेचा विषय ठरला आहे. संजय राऊत यांनी म्हटल्याप्रमाणे ते खरंच पत्रकार परिषदेत उपस्थित राहून प्रश्न विचारणार का?, अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत.

ठाकरे गटाला धक्का! आमदार वायकरांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय? 

दरम्यान, औरंगाबादमध्ये पार पडणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी शहरातील पंचतारांकीत हॉटेल राम इंटरनॅश्नलमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांसाठी 30 रूम बुक करण्यात आल्या आहेत.याशिवाय दुसरे फाईव्ह स्टार हॉटेल असलेल्या ताज हॉटेलमध्ये सर्व सचिवांसाठी 40 रूम्स बुक करण्यात आल्या असून, उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकाऱ्यांसाठी अमरप्रीत हॉटेलमधील 70 तर, अजंता अॅम्बेसेडरमध्ये 40 रूम बुक करण्यात आल्या आहेत.

त्याशिवाय सुरक्षा रक्षक आणि वाहन चालकांसाठी महसूल प्रबोधिनी आणि पाटीदार भवन येथील 100 रूम्स बुक करण्यात आल्या आहेत. प्रशासनातील इतर अधिकारी वर्गासाठी वाल्मी, सिंचन, महावितरण, सुभेदारी विश्रामगृहे येथे 20 रूम्स बुक करण्यात आल्या आहेत. अलिशान हॉटेलमधील निवासी व्यवस्थेसोबतच नेते मंडळी, सचिव आणि अन्य अधिकाऱ्यांच्या जाण्या येण्यासाठी 300 गाड्यांचा ताफा बुक करण्यात आला आहे. या सर्व अधिकारी आणि मंत्र्यांना ने-आण करण्यासाठी नाशिक आणि औरंगाबाद शहरातील 150 गाड्या भाडे तत्त्वावर घेण्यात आल्या आहेत.

आपण काहीतरी पाप केलयं; राऊतांनी सांगितली अजितदादांच्या मनातली सल

 

Tags

follow us