Rajan Salvi May Join Eknath Shinde Group : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण राजन साळवी (Rajan Salvi) मशालीची साथ सोडत धनुष्यणबाण हातात घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळतेय. रत्नागिरीमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे दोन माजी आमदार शिंदेसेनेमध्ये (Eknath Shinde)प्रवेश करणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरल्याची देखील माहिती मिळतेय.
राजकीय वर्तुळात राजन साळवी एकनाथ शिंदेंच्या पक्षात प्रवेश करणार आहे, या चर्चांमुळे मोठी खळबळ उडाली (Maharashtra Politics) आहे. तर राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांना फोन केलाय, अशी माहिती देखील समोर येत आहेत. पक्षप्रवेशाची तारीख देखील निश्चित झाली असल्याचं बोललं जातंय.
शिर्डीत दहशत! हवेत गोळीबार करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
कोकणात उद्धव ठाकरेंना राजन साळवींचा मोठा आहे. ते कोकणातील एक महत्वाचे अन् मोठे नेते आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यानंतर आता त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केलाय, अशी माहिती समोर आलीय. राजन साळवी 13 तारखेला शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय. मात्र अजून साळवी यांनी यांसंदर्भात कोणतंही वक्तव्य केलेलं नाही, अधिकृत माहिती मिळालेली नाही.
काही दिवसांपूर्वी राजन साळवी यांनी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत, असं म्हटलं होतं. मी नाराज असून भाजपच्या वाटेवर असल्याचं तुमच्या माध्यमातून मला समजतंय. परंतु या सगळ्या केवळ अफवा आहेत. मी बाळासाहेबांचा निष्ठावंत सैनिक आहे. माझ्या मनात कोणतीही शंका नाही, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं होतं.
शिर्डीत दहशत! हवेत गोळीबार करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
तर दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यात उद्धव ठाकरे गटाचे दोन माजी आमदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. माजी आमदार सुभाष बने आणि गणपत कदम हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार आहेत. त्यांनी देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. 15 फेब्रुवारी रोजी एकनाथ शिंदे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचं बोललं जातंय. यामुळे कोकणात ठाकरे गटाला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे.