Shrigondha Apmc Election: श्रीगोंद्यातील काष्टी ग्रामपंचायतीमध्ये काका आमदार बबनराव पाचपुते यांना पुतण्या साजन पाचपुते यांना धक्का दिला होता. आता पुन्हा बबनराव पाचपुते यांचे टेन्शन पुतण्याने वाढविले आहे. साजन पाचपुते आता बाजार समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. त्यामुळे आता काका-पुतण्यात पुन्हा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे.
थोरात-विखेंमध्ये आता बाजार समित्यांमध्ये संघर्ष !
गेल्या वर्षी श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायतीच्या निकालाकडे लक्ष लागले होते. तेथे सरपंच पदासाठी आमदार पाचपुते यांचे चिरंजीव प्रताप आणि पुतण्या साजन यांच्यात जोरदार लढत झाली. अखेर १६१ मतांनी साजन पाचपुते विजयी झाले. स्वत: आमदार पाचपुते यांना पराभवाचा धक्का बसला. १० सदस्य पाचपुते यांचे तर ७ सदस्य साजन यांचे निवडून आले असले तरी थेट निवडणूक असल्याने सरपंच पद साजन यांच्याकडेच गेले होते.आता हाच पुतण्या पाचपुतेंविरोधात बाजार समितीमध्ये विरोधात गेला आहे.
कर्डिलेंविरोधात पुतण्याने ठोकला शड्डू, माजी खासदाराचा नातूही रिंगणात
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या होत असलेल्या निवडणुकीत १८ जागांसाठी ४८ उमेदवार रिंगणात आहे. या ठिकाणी वेगळी राजकीय समीकरण उभे राहिले आहे. काँग्रेसचे राजेंद्र नागवडे व भाजपचे आमदार बबनराव पाचपुते हे एकत्र आले आहे. या दोघांचा किसान क्रांती पॅनल आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे माजी राहुल जगताप, बाळासाहेब नाहाटा, घनश्याम शेलार यांचा शेतकरी विकास पॅनलमध्ये लढत होत आहे. दोन्ही बाजूने मातब्बर उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. या निवडणुकीत बारा अपक्ष उमेदवार नशीब आजमावत आहेत.
सेवा संस्था मतदारसंघातील सर्वसाधारण सात जागांसाठी पाचपुते-नागवडे गटातर्फे दत्तात्रय पानसरे, रोहिदास पवार, संतोष ओव्हळ, सुभाष वाघमारे, निवास नाईक, रामदास झेंडे रिंगणात आहेत. तर जगताप गटातर्फे दीपक भोसले, भास्कर वागसकर, अजित जामदार, पंडित गायकवाड, अनिकेत शेळके नितीन डूबल, बाबासाहेब जगताप यांना रिंगणात उतरवले आहे. महिला राखीवच्या दोन जागांसाठी पाचपुते-नागवडे गटातर्फे सविता भीमराव नलगे आणि सविता बाबासाहेब बारगुजे यांना तर जगताप गटातर्फे अंजली संदीप रोडे आणि मनीषा योगेश यांना रिंगणात उतरविण्यात आले आहे.
ग्रामपंचायत मतदारसंघातील सर्वसाधारण दोन जागांसाठी जगताप गटाने साजन पाचपुते आणि मितेश नाहाटा यांच्याविरोधात पाचपुते-नागवडे गटाने महेश दरेकर आणि सुदाम झराड यांना मैदानात उतरवले आहे. काष्टीचे सरपंच साजन पाचपुते हे आता माजी आमदार राहुल जगताप यांच्या गटात आहे. त्यामुळे आमदार पाचपुते यांच्यासाठी हा धक्का आहे.
https://www.youtube.com/watch?v=8OXG2AS8c5g