थोरात-विखेंमध्ये आता बाजार समित्यांमध्ये संघर्ष !
Radhakrishna Vikhe Vs Balasheb Thorat : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा राजकीय संघर्ष आता बाजार समित्यांच्या निवडणुकीमध्ये आला आहे. विखेंचा मतदारसंघातील राहाता बाजार समितीसाठी थोरात यांनी पॅनल दिला आहे. तर विखेही संगमनेर बाजार समितीमध्ये सक्रीय झाले आहे. त्यांनाही संगमनेरला पॅनल दिला आहे. त्यामुळे या नेत्यांमध्ये बाजार समित्यांमध्ये राजकीय घमासान पाहिला मिळणार आहे.
कर्डिलेंविरोधात पुतण्याने ठोकला शड्डू, माजी खासदाराचा नातूही रिंगणात
राहाता बाजार समितीच्या अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट झाले. विखे पाटील यांच्या गटाच्या हमाल मापाडी मतदारसंघातील १ जागा व व्यापारी मतदारसंघाच्या दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळात व बाळासाहेब थोरात यांच्या महाविकास आघाडी शेतकरी परिवर्तन मंडळात थेट लढत होत आहे. संचालक मंडळाच्या १५ जागांसाठी दुरंगी लढत होत आहे. एका अपक्षासह ३१ उमेदवार रिंगणात आहे.
MLA Sangram Jagtap : नगरकरांना वेठीस धरु नका, आमदार संग्राम जगतापांनी सुनावलं…
तर संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती थोरात आणि विखे या दोन्ही गटातील तब्बल ५४ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता १८ जागांसाठी ४५ उमेदवार निवडणूक रिंगणात असणार आहेत. या वेळी प्रथमच काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्या गटाच्या राधाकृष्ण विखे पाटील यांचा गट निवडणूक रिंगणात अधिकृत पॅनल करून उतरला आहे. त्यामुळे आता आजी-माजी मंत्र्यांच्या गटात खऱ्या अर्थाने दुरंगी लढत होणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीमध्येही विखे हे थोरात यांच्याविरोधात सक्रीय झाले होते.त्या ठिकाणी अनेक ग्रामपंचायती विखे यांनीही आपल्या ताब्यात घेतल्या होत्या. त्यानंतर आता विखे यांनी संगमनेर बाजार समिती ताब्यात घेण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे दोघांमध्ये आता बाजार समित्यांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे.