Shrikant Shinde 500 crore audio clip: मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनादरम्यान 500 कोटी रुपये दिल्याचा दावा करणाऱ्या कथित ऑडिओ क्लिपवरून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा सुरू आहे. या क्लिपमध्ये भाजपकडून (BJP) दिलेले 500 कोटी रुपये खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत जरांगे यांच्यापर्यंत पोहोचवल्याचा दावा करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणावरून मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलं होतं. आता श्रीकांत शिंदे यांनी या आरोपांवर प्रतिक्रिया दिली असून, “500 कोटी रुपये कुठे गेले? तेच पैसे मी आता शोधायला चाललो आहे,” असं ते म्हणाले.
500 कोटींच्या कथित प्रकरणात गुन्हा दाखल का नाही? SITच्या तपासावरून संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल
‘500 कोटी रुपये कुठे गेले, ते मला कळालं तर सांगतो’
शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना श्रीकांत शिंदे यांनी कथित ऑडिओ क्लिपमधील दाव्यांचा उल्लेख केला. आपल्यापर्यंतही हे पैसे पोहोचले नसल्याचं सांगत त्यांनी या रकमेबाबत प्रश्न उपस्थित केला.
श्रीकांत शिंदे म्हणाले, “ते 500 कोटी रुपये माझ्यापर्यंतही पोहोचलेले नाहीत. मनोज जरांगे पाटील यांना जो प्रश्न पडला तोच मलाही पडला आहे. 500 कोटी रुपये कुठे गेले? तेच पैसे मी आता शोधायला चाललो आहे.”
500 कोटी रुपये मोजायला किती गाड्या लागतील?
या विषयावर बोलताना श्रीकांत शिंदे यांनी मिश्किल टिप्पणीही केली. 500 कोटी रुपये एकत्र कसे दिसतील आणि ते नेण्यासाठी किती गाड्या लागतील, याची चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.
ऑडिओ क्लिपनंतर जरांगेंनी घेतला मोठा निर्णय; मराठा समाजाला केले ‘हे’ आवाहन
“आमची आता तीच चर्चा सुरु होती की, 500 कोटी रुपये एकत्र कसे दिसतील? किती गाड्या लागतील, हा विचार आम्ही करत होतो,” असं श्रीकांत शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
कथित ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वर्तुळात विविध दावे केले जात असताना या प्रकरणाची चौकशी आणि शहानिशा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचंही श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. आपणही गेल्या दोन दिवसांपासून या प्रकरणाची माहिती घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
“या सगळ्या प्रकाराची चौकशी आणि शहानिशा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मीदेखील दोन दिवस रिसर्च करत होतो, 500 कोटी रुपये कुठे गेले? मला कळालं तर मीदेखील तुम्हाला सांगतो,” असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं.
500 कोटींच्या क्लिपवरून जरांगेंचा रामदास कदमांना थेट सवाल; नेमकं पोटात काय शिजतंय?
दरम्यान, या कथित ऑडिओ क्लिपमधील दाव्यांची सत्यता चौकशीतून स्पष्ट होणार आहे. श्रीकांत शिंदे यांनी हे आरोप फेटाळत 500 कोटी रुपये आपल्यापर्यंत पोहोचले नसल्याचं म्हटलं आहे.
