Download App

अयोध्येतील वातावरण पाहून विरोधकांना झोप येणार नाही; श्रीकांत शिंदेचा हल्लाबोल

  • Written By: Last Updated:

Shrikant Shinde on ayodhya tour : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) हे आपल्या आमदारांसह अयोध्या दौऱ्यावर आहेत. आज मुख्यमंत्री शिंदे हे अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेऊन शरयू नदीच्या (Sharyu River) तीरावर महाआरती करणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यासंदर्भात (Ayodhya Tours) अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. अयोध्या दौऱ्यावरून चांगलंच राजकारण तापलं आहे. खासदार संजय राऊतांसह शरद पवारांनी या दौऱ्यावर टीका केली होती. विरोधकांकडून या दौऱ्यावर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. तर दुसरीकडे मात्र, अयोध्या दौरा हा बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी केला जात असल्याचं शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे. शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, अयोध्येतील जोश पाहून विरोधक झोपू शकणार नाहीत.

खासदार श्रीकांत शिंदे यांनी बोलतांना सांगितलं की, प्राण जाये पर वचन जाये, असं ठाकरे गट सांगतो. पण, वचन कोणी तोडले. हिंदुत्व कोणी सोडले? आमच्यावर टीका केली जातेय की, शिंदे-फडणवीस सरकारचं राज्य हे रावण राज्य आहे. पण, जनेतला ठाऊक आहे की, कोणतं सरकार हे रामराज्य आहे, आणि कोणतं सरकार हे रावण राज्य आहे. आम्ही इथं राजकारण करायला आलो नाही. दर्शन घ्यायला आलो आहोत. आज जो काही जोश अयोध्येत दिसतो, तो पाहून विरोधकांना झोप येणार नाही, अशी टीका त्यांनी केली.

आदित्य ठाकरेंच्या जन्माआधी… मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचं जोरदार प्रत्युत्तर

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या दौऱ्याविषयी बोलतांना सांगितलं की, हिंदुत्व महाराष्ट्रात आलं म्हणजे, देशात आलं. रामराज्य महाराष्ट्रात येणार. मुंबईचं आकर्षण हे अख्या देशाला आहेत. महाराष्ट्र हा मिनी भारत आहेत. त्यामुळं सर्वांना उत्सुकता आहे की, मुख्यमंत्री हे राम लल्लाचं दर्शन घ्यायला येत आहेत. दरम्यान, राज्यात काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत बंडाळी झाली. त्यावर गिरीश महाजन यांनी सांगितलं की, हे ठरवून झालं. शिवसेनेतील मंत्र्यामध्ये तशी कुजबूज होती. याबाबत बोलतांना केसरकर यांनी सांगिलं होतं.
महाराष्ट्रात जे घडलं ते उत्स्फुर्त होतं. आमचं बंड हे हिंदुत्वाच्या रक्षणासाठी होतं. बाळासाहेबांच्या विचारांसाठी होतं, असं ते म्हणाले.

शंभूराजे देसाई यांनी सांगिलतं की, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचं स्वप्न् होतं की, अयोध्येला राम मंदिर व्हावं. आणि ते होत आहे. हे चांगली बाब आहे. मागच्या महाविकास आघाडीचं सरकार असतांना अयोध्या दौरा ठरला होता. मात्र, विमानतळावर आल्यावर आम्हाला वापस पाठवलं होतं. विमानात बसण्याआधी आम्हाला परत जाण्यास सांगितलं होतं. मात्र, आम्हाला परत पाठवण्यामागे नेमकं काय होतं, हे आम्हाला आजही कळलं नाही, असं त्यांनी सांगितलं

दरम्यान, महाराष्ट्र राज्य हे देशातील नंबर एकच राज्य व्हावं. राज्य सुजलाम-सुफलाम व्हावं. शेतकरी, कष्टकरी वर्गावर आलेललं अवकाळी पावसाचं संकट दूर व्हावं, अशी प्रभू श्रीरामचंद्राकडे प्रार्थना करणार आहोत, असं देसाई यांनी सांगितलं.

Tags

follow us