Download App

‘डोंबिवलीत लढूनच दाखवा बघूया, किसमें है कितना दम’; आदित्य ठाकरेंना श्रीकांत शिंदेंचं चॅलेंज!

Shrikant Shinde : शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना फैलावर घेत शिंदे घाबरून पळून गेले अशी टीका केली होती. त्यांच्या याच टीकेवर आता एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका करत त्यांना थेट आव्हानच दिले. आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना वरळीतून निवडणूक लढून दाखवण्याचं आव्हान दिलं होतं. त्यालाही शिंदे यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले. डोंबिवलीत त्यांचं (आदित्य ठाकरे) आजोळ आहे. त्यांनी या ठिकाणी येऊन लढावं मग बघु किसमें है कितना दम असं चॅलेंजच आदित्य ठाकरेंना दिलं.

Praful Patel : ‘तेव्हाच सगळे आमदार भाजपबरोबर जाणार होते’; पटेलांनी खोडला पवारांचा दावा

शिंदे म्हणाले, काही लोक लायकी सोडून बोलले. त्यांना बालबुद्धी म्हटलं जातं, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे. आधीचे मुख्यमंत्री 24 तास घरीच असायचे. त्यांना कोण घाबरणार. आताचे मुख्यमंत्री मागील दीड वर्षापासून दिवसरात्र काम करत आहेत. आधीचे मुख्यमंत्री ऑनलाइन येऊन गरम पाणी प्यायला लावायचे. मात्र आमचे मुख्यमंत्री ग्राउंडवर जाऊन काम करतात. आजारी असतानाही मुख्यमंत्री तब्बल दोन तास ईर्शाळवाडी डोंगर चढून तेथे गेले होते. संकटग्रस्तांना मदत केली. मुख्यमंत्र्याचं जेवढं वय तितकी यांची कारकिर्दही नाही. बाळासाहेबांच्या पुण्याईने तुम्ही आहात, अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर केली.

जेलमध्ये कोण जाणार हे कळेलच

मुख्यमंत्री सकाळी लवकर उठत नाही. ज्या प्लेनने ते जात होते त्याचं तिकिट कोणी काढलं हे सांगा? एवढा मोठा प्लॅटफॉर्म होता तेथे तुम्ही तुमच्या कारकिर्दीत काय केलं हे सांगायचं राहिलं. पर्यावरण मंत्री असताना काय केलं? असा सवाल श्रीकांत शिंदे यांनी केला. जेलमध्ये जाण्याच्या भितीने शिंदे गेल्याचे आरोप केले. हे धंदे आम्ही केले नाहीत. कोविडमध्ये कोणाचा हात आहे. कोणी पैसे खाल्ले, खिचडी पण सोडली नाही. ३०० ग्रॅम खिचडीतील फक्त १०० ग्रॅम मिळायची. लाईफलाईनला टेंडर कंपनी स्थापन व्हायच्या आधीच मिळालं त्यामुळे जेलमध्ये येणाऱ्या काळात कोणाला जावं लागेल ते कळेल, असा इशाराही त्यांनी दिला.

रेपो रेट जैसे थे! कर्जदारांचा EMI वाढणार नाही; RBI कडून सर्व सामान्यांना मोठा दिलासा

Tags

follow us

वेब स्टोरीज