Download App

वयोवृद्ध नेत्याला एकट सोडणे, हा नालायकपणा : सख्या भावाने अजितदादांना फटकारले

  • Written By: Last Updated:

Shrinivas Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) भाजपमध्ये (BJP) जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर अख्खं पवार कुटुंबिय त्यांच्या विरोधात गेलं. अजित पवारांनी शरद पवारांना दगा देणं हे पवार कुटुंबियांना आवडलं नाही. आता त्यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार (Shrinivas Pawar) यांनीही अजित पवारांनी साथ सोडली आहे. बारामतीच्या काटेवाडी ग्रामस्थांशी संवाद साधताना श्रीनिवास पवा त्यांनी अजित पवारांच्या निर्णयाशी आपण सहमत नाही, वयोवृद्ध नेत्याला एकट सोडणे, हा नालायकपणा असल्याची टीकाही त्यांनी केली.

Crew Trailer: तब्बू- क्रिती- करीनाच्या आगामी ‘क्रू’ सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज 

अजित पवार यांच्या बंडाबद्दल त्यांचे भाऊ श्रीनिवास पवार यांनी पहिल्यांदाच आपली भूमिका मांडली. ते  म्हणाले, तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, मी दादांच्या विरोधात कसा? मी नेहमी त्याला साथ दिली. भाऊ म्हणून मी तो म्हणेल, तशी उडी मारली. दादांची माझी चर्चा झाली, त्यावेळेस मी त्याला म्हणालो, आमदारकीला तू आहेस, तर खासदारकी साहेबांना दिली पाहिजे. कारण साहेबांचे आमच्यावरती उपकार आहेत, हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहेत.

जमीन आपल्या नावावर केली म्हणून त्यांना घराबाहेर काढायचं नाही, ज्यांना कोणाला काही पदं मिळाली, ती साहेबांमुळं मिळाली. साहेंबाना म्हणायचे कीर्तन करा, घरी बसा हे काय मला पटलं नाही. जे लाभार्थी आहेत, त्यांच्यामागे मला जायचं नाही. मी वेगळा माणूस आहे. आपण, औषधांची खरेदी करतो, त्याला एक्सपायरी डेट असते. वाईट वाटून घ्यायचं नाही. मला दबून जगायचं नाही. जगायचं तर स्वाभिमानाने, असं श्रीनिवास पवार म्हणाले.

माझे काही मित्र म्हणाले आता इथून पुढं दादांची वर्षे आहेत. साहेंबांची काही नाहीत. तो विचार मला वेदना देऊन गेला. आपण वयस्कर झालेल्या माणसांची किंमत करत नाही. का तर आपण पुढची 10 वर्षे दुसऱ्या माणसांकडून लाभ मिळणार आहे. वयोवृद्ध नेत्याला एकट सोडणे, हा नालायकपणा आहे, असं म्हणत त्यानी अजितदादा गटावर टीका केली.

भाजपला शरद पवारांना संपवायचे होते

साहेबांनी काय केलं, असं हा प्रश्न विचारला. ज्या साहेबांनी आपल्याला चार वेळा उपमुख्यमंत्री केलं. 25 वर्षे मंत्री केलं. मला जर असा काका मिळाला असता तरी मी खूष झालो असतो. ही सगळी चाल भाजपची आहे. भाजपला शरद पवारांना संपवायचे होते. घरातला माणूस जर बाहेर पडला तर आपण घर फोडू शकतो, वय वाढलं म्हणून वयस्कर माणसाला तुम्ही कमजोर समजू नका, असंही श्रीनिवास पवार म्हणाले.

 

follow us