Sharad Pawar : तुमच्या काळात किंवा तुमच्यासह मुख्यमंत्री होण्यासाठी तेव्हा किती जण इच्छुक होते. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री व्हायचे असेल तर चर्चा करायची नाही, हे सुत्र पाळायचे असते, असे अत्यंत मिश्किल उत्तर दिले. मात्र, आमच्यावेळी राजकारणात मर्यादा होत्या. सुसंस्कृत पणा होता. आता सारखी टोकाची भूमिका नव्हती, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.
‘सिंहासन’ चित्रपटाच्या ४४ वर्षपूर्तीनंतर यशवंतराव चव्हाण सेंटरने विशेष संवाद आयोजित केला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अभिनेते डॉ. मोहन आगाशे, नाना पाटेकर यांच्याशी अंबरीश मिश्र, राजीव खांडेकर यांनी संवाद साधला.
या चित्रपटाच्या प्रक्रियेबाबत डॉ. जब्बार पटेल यांनी सांगितले की, कादंबरीमधून ‘सिंहासन’ हा विषय कळला. पात्र हा विषय आमचा आहे. त्यांनी त्यामची त्यांची भूमिका अफलातून निभावली आहे. १९७९ मध्ये फक्त सव्वा चार लाख रुपयात सिंहासन हा सिनेमा तयार झाला आहे. प्रत्येक अभिनेत्याला एक रुपया मानधन दिले होते.
जेपीसीच्या मागणीवरून शरद पवारांचे घुमजाव! म्हणाले… – Letsupp
नाना पाटेकर म्हणाले की, आज मी आणि डॉ. मोहन आगाशे असे दोघेच इथे खांबासारखे बसलो आहे. कारण सिंहासन चित्रपटामधील आता कलाकार गेले. मी आणि मोहन मागे उरलो आहोत. मला चित्रपटासाठी तीन हजार रुपये मानधन दिले. ३० महिन्याचे राशन दिले. पण अजून दोन हजार दिलेले नाही.
डॉ. मोहन आगाशे म्हणाले की, मला छोटा का होईना पण महत्वाची भूमिका हवी होती. कारण त्यामुळे इतरांवर कुरघोडी करता आली पाहिजे, अशी माझी इच्छा होती.
तर खासदार सुप्रिया सुळे यांनी बोलताना ‘सिंहासन’ हा सिनेमा जेव्हा जेव्हा पाहते. त्या-त्या वेळी वेदना होतात.