Download App

कोपरगावमध्ये युतीधर्म पाळला जाणार; कोल्हे परिवाराचा आशुतोष काळे यांना पाठिंबा

  • Written By: Last Updated:

Snehlata Kolhe Support Mahayuti candidate Ashutosh Kale : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोपरगावमध्ये आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांना स्नेहलता कोल्हे (Snehlata Kolhe) यांनी पाठिंबा दिलाय. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार आशुतोष काळे यांनी काल संजीवनी उद्योगसमूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या निवासस्थानी जाऊन आशीर्वाद घेतले. युती धर्माचं पालन करू, सर्वशक्तीनीशी तुमच्या पाठीशी उभे राहू, या शब्दांमध्ये कोल्हे दाम्पत्याने आशुतोष काळे यांना पाठिंबा (Assembly Election 2024) देण्याची घोषणा केलीय.

विधानसभा मतदानाला केवळ सहाच दिवस शिल्लक राहिले आहेत, अशातच कोल्हेंनी काळे यांना राजकारणात पाठिंबा दिलाय. त्यामुळे महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांना फायदा होणार आहे. कोपरगावमध्ये युतीधर्म पाळल्याने विवेक कोल्हे यांना विधानपरिषदेमध्ये संधी मिळण्याचा मार्ग देखील मोकळा झालाय. विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर या भेटीची अन् पाठिंब्याची माहिती दिलीय. कोल्हे परिवाराने देखील या वृत्तास दुजोरा दिलेला आहे.

Ashutosh Kale : मोठी बातमी! राष्ट्रवादीकडून आ.आशुतोष काळेंची उमेदवारी जाहीर

यंदा विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहावरून विवेक कोल्हे आणि त्यांच्या परिवाराने थांबण्याचा निर्णय घेतला. राजकीय आखाड्यामध्ये यंदा काळे आणि कोल्हे या दोन्ही परिवार युतीधर्म पाळणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या दृष्टीने विवेक कोल्हे आणि अमित शहा यांची भेट घडवून आणली होती. त्यानंतर कोल्हे परिवाराने हा निर्णय घेतलाय. या भेटीत विवेक कोल्हेंना विधानपरिषद किंवा राज्यसभेवर संधी देण्याचं आश्वासन देण्यात आल्याचं समोर आलं होतं.

आ. आशुतोष काळेंमुळे कोपरगावला अच्छे दिन, एमआयडीसी क्रांतिकारी निर्णय : काका कोयटे

कोपरगाव मतदारसंघात आमदार आशुतोष काळे आणि युवानेते विवेक कोल्हे वर्षानुवर्षे एकमेकांच्या विरोधात संघर्ष करीत आलेले आहेत. त्यामुळे गावपातळीवरील कार्यकर्त्यांचं मनोमिलन घडवून आणण्यासाठी दोन्ही नेत्यांनी प्रयत्न केलेत. युतीधर्म पाळण्याची गरज देखील समजावून सांगितली. विवेक कोल्हे यंदा निवडणुकीतून थांबल्यामुळे आमदार आशुतोष काळे यांच्या दृष्टीने जमेची बाजू ठरल्याचं दिसत आहे. आता आशुतोष काळे यांना कोल्हे परिवाराने या विधानसभा निवडणुकीत पाठिंबा दिलाय.

 

follow us