मोहिते पाटलांची घरवापसी! उमेदवारीही फिक्स अन् अर्जाची तारीखही

Madha Loksabha : सोलापुरातील माढा मतदारसंघासाठी (Madha Loksabha) धैर्यशील मोहित पाटलांची (Dhairyasheel Mohite Patil) शरद पवार गटाकडून (Sharad Pawar Group) उमेदवारी निश्चित होणार असल्याची शक्यता आहे. येत्या 13 एप्रिल रोजी धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेश सोहळ्याला विजयसिंह मोहिते पाटील (Vijay Singh Mohite) आणि जयसिंह मोहिते पाटील उपस्थित […]

Dharyashil Mohite Patil Sharad Pawar

Dharyashil Mohite Patil Sharad Pawar

Madha Loksabha : सोलापुरातील माढा मतदारसंघासाठी (Madha Loksabha) धैर्यशील मोहित पाटलांची (Dhairyasheel Mohite Patil) शरद पवार गटाकडून (Sharad Pawar Group) उमेदवारी निश्चित होणार असल्याची शक्यता आहे. येत्या 13 एप्रिल रोजी धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेश सोहळ्याला विजयसिंह मोहिते पाटील (Vijay Singh Mohite) आणि जयसिंह मोहिते पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. तर माढा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटलांची उमेदवारी फिक्स मानली जात असून अर्ज भरण्याची तारीखही निश्चित झाली आहे.

राज्यात मुसळधार पाऊस, उष्णतेपासून मिळणार दिलासा, वाचा नवीन हवामान अंदाज

महाविकास आघाडीत शरद पवार गटाला दहा जागा मिळाल्या आहेत. त्यातील दोन उमेदवारांच्या याद्या जाहीर करीत शरद पवार गटाकडून 9 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. आता फक्त सोलापुरातील माढा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा करण्याचं बाकी होतं. अखेर आज धैर्यशील मोहिते पाटलांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेऊन माढा मतदारसंघातून उमेदवारी अन् पक्षप्रवेश फिक्स केला असल्याचं सांगितल ंजात आहे. तर 16 एप्रिल रोजी धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.

संसदेतील भाषणांनी मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाही, भाषणं मी ही एक नंबर करतो; अजितदादांचा सुप्रिया सुळेंना टोला

दरम्यान, माढ्यात भाजपने पुन्हा एकदा खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे त्यांनी गावभेटी, मेळावे सुरू केले आहेत. पण त्यांना महायुतीमधील आणि राजकारणातील मोहिते-पाटील आणि रामराजे नाईक-निंबाळकर या दोन मातब्बर घराण्याचा विरोध आहे. यासाठी दोन्ही घराण्यातील प्रमुखांच्या अनेक भेटीही झाल्या आहेत. त्यातून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात जाऊन उमेदवारी घेण्याचा पर्याय पुढे आला आहे.

Exit mobile version