Download App

पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा पाणी प्रश्न तत्काळ मार्गी लावा

  • Written By: Last Updated:

नागपूर : ‘पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. वाढत्या लोकसंख्येसोबत शहरातील सोयीसुविधांत वाढ होण्याची गरज आहे. हिंजवडीसारख्या परिसरातील उद्योग राज्याबाहेर हैदराबादकडे स्थलांतरित होत आहेत. युवकांच्या नोकऱ्यांचा प्रश्न आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महत्त्वाची शहरं असून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करुन हे सर्व प्रश्न तत्काळ मार्गी लावावेत.’ अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केली आहे.

राज्यात सध्या नागपूरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. राज्यात नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा सध्या दुसरा आठवडा सुरू असून यादरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत विविध मुद्द्यांहून शिंदे-फडणवीस सरकारला घेरल्याचं दिसून आलं. यामध्ये भ्रष्टाचाराचे वेगवेगळे प्रकार समोर योत आहेत. यामध्ये आता सरकारमधील तीन मंत्र्याबाबत गैरव्यवहाराची माहिती आली आहे.

यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बॉम्ब फोडणार असल्याचं सांगितलं होत. याबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार यांना विचारले असते त्यांनी ठोस पुरावे असल्याशिवाय बोलणार नाही, फुसका बार नसला पाहिजे, असे सांगून संजय राऊतांना अजित पवार यांनी टोला लगावला आहे. तर मी म्हटलच नव्हतं बॉम्ब फोडणार आहे. तर फक्त शिंदे गटाच्या मंत्र्यांवरच आरोप कारायचे अशी आमची भूमिका नाही. असं देखील अजित पवार म्हणाले.

Tags

follow us