Download App

ये पब्लिक है, सब जानती है! शिवसेनेच्या 15 जागा निवडून येणार; मुख्यमंत्र्यांचा दावा

एका वृ्त्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या म्हणजे शिवसेनेच्या 15 जागा निवडून येतील असा दावा केला.

Image Credit: letsupp

CM Eknath Shinde : आपल्याकडे विकासाचा अजेंडा आहे तर उद्धव ठाकरेंकडे कोणताही अजेंडा नसल्याने ते एक नॅरेटिव्ह तयार करत असल्याचा आरोप राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. आपण आतापर्यंत खूप कामं केली, गेल्या दोन वर्षांमध्येही अनेक कामं केली, त्याच कामाच्या जोरावर मी शिवसेनेचे सर्व 15 उमेदवार निवडून आणणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ते एका वृत्तवाहिनीवर बोलत होते.

 

महायुती राज्यात एक नंबरला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या काळात विकासकामांना लागलेला ब्रेक या अडीच वर्षांमध्ये आम्ही उखडून फेकला. मात्र, ज्यांना दिवस रात्र, उठता बसता खोक्यांशिवाय चैन पडत नाही त्यांना खोक्यांची आठवण येते. यांना खोके नाही तर कंटेनर लागतात हे माझ्याशिवाय जास्त कुणाला माहिती असणार असा टालोही त्यांनी यावेळी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला. दरम्यान, गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत महायुती राज्यात एक नंबरला आली असंही फडणवीस म्हणाले.

 

ये पब्लिक है, सब जानती हे

राज्यात आणि मुंबईत उद्धव ठाकरेंना कोणतीही सहानुभूती नसून येत्या 4 जून रोजी लोकांच्या भावना कुणासोबत आहेत हे समजेल असं एकनाथ शिंदे म्हणाले. मी जे बोलतो त्याला पुरावे आहेत, ये पब्लिक है, सब जानती हे, काम करणाऱ्याच्या मागे लोक राहतात असा दावाही शिंदे यांनी यावेळी केला.

 

12 आमदारांना निलंबित केलं

उद्धव ठाकरेंनी सुरुवातीला भाजपला फसवलं आणि नंतर ते महाविकास आघाडीला फसवण्याच्या तयारीत होते असा खळबळजनक दावा शिंदे यांनी केला. विरोधी पक्षाच्या काही नेत्यांना जेलमध्ये टाकायचा यांचा प्रयत्न होता असा खुलासाही शिंदे यांनी केला आहे. विरोधी पक्षाच्या 12 आमदारांना निलंबित केलं होतं, हे सर्व त्यांची खुर्ची वाचवण्यासाठी करत असल्याचा आरोपही शिंदे यांनी यावेळी केला.

 

आमचे सर्व उमेदवार निवडून येतील

शिंदेंना काही जागांवर उमेदवार भेटत नव्हते हा विरोधकांचा आरोप खोडून काढत एकनाथ शिंदे म्हणाले की, आमच्याकडे उमेदवारांची स्पर्धा होती. तिकीट एकच असल्याने निर्णय घेताना मोठी कसरत झाली. या देशातला देशभक्त मतदार हा उद्धव ठाकरेंना येत्या 4 जूनला जागा दाखवणार. त्यामुळे महायुतीच्या 45 पेक्षा जास्त जागा निवडून येतील असा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

follow us

वेब स्टोरीज