Download App

ऑनलाईन एमओयू करता येत नाही, माहितीचा अभाव असल्यानं बच्चू कडू…; मुनगंटीवारांची टीका

  • Written By: Last Updated:

Sudhir Mungantiwar On Bachchu Kadu : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) हे काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं (Waghnakh) आणण्याबाबत करार करण्यासाठी लंडनला गेले होते. ते वाघनखं न घेताच परत आलेत. यावरून प्रहार संघटनेचे अध्यक्ष -आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी उपाहासात्मक टीका केली. सुधीर भाऊ, वाघनखं आणायला गेले, पण वाघनखं आणलीच नाहीत. आता त्यांना खाजवालयालाही नखं राहिली नाहीत. मुळात करार करण्यासाठी लंडनला जाण्याची गरज नव्हती, अशी टीका कडूंनी केला. त्यावर आता मुनगंटीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

अजितदादांनी नकाराचा ‘काही दिवसांतच’ बदला घेतला; मीरा बोरवणकरांचा आणखी एक स्फोटक दावा 

वाघनखांवरून सुरू झालेलं राजकारण काही थाबायंचं नाव घेत नाही. यापूर्वी आदित्य ठाकरेंनी ती वाघनखं खरंच शिवरायांनी वापरलेली होती की, शिवकालीन आहेत, याची माहिती द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर मुनगंटीवार आणि उदय सामंत यांचा लंडन दौरा नुकताच झाला. या दौऱ्यात ३ ऑक्टोबरला या वाघनखांबाबद करार झाला. त्यानंतर ते मुंबईतही परतले. पण, वाघनंख कधी येणार हे ते सांगू शकले. यावरून कडूंनी त्यांच्यावर टीका केली.

दरम्यान, कडू यांच्या टीकेवला प्रत्युत्तर देतांना मुनगंटीवार म्हणाले की, बच्चू कडूंना असं उपहासात्मक बोलण्याची गरज नव्हती. बच्चू कडूंकडून ही अपेक्षा नाही. वाघनखांबद्दल त्यांनी असं वक्तव्य करणं बरोबर नाही. उद्या ते आमदारकीच्या निवडणुकाही घेऊ नका, असं म्हणतील. कारण, आमदारकीच्या निवडणुकांसाठी कोट्यावधी रुपये खर्च होतात. एका लोकसभा निवडणुकीत 25 कोटी रुपये खर्च केले जातात. त्यामुळे 20 वर्षांतून एकदा निवडणूका घ्या, अशी सूचना त्यांनी केली नाही, हे बरं झालं.

अधिवेशन ऑनलाइन घेतलं तर करोडो रुपये वाचतील, अशी सूचना त्यांची कदाचित असू शकते. कारण, अधिवेशनात एका मिनीटाल 70 हजार रुपये खर्च होतात, असं मुनगंटीवार म्हणाले.

ते म्हणाले, खरं तर, अशाप्रकारे ऑनलाईन एमओयू करता येत नाही. हे कदाचित त्यांना माहित नसेल. अनेक वेळा आमदार विधानमंडळात निवडून येतात, मात्र माहितीच्या अभाव असल्यानं अशा प्रतिक्रिया देत असतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

काय म्हणाले बच्चू कडू?

सुधीर भाऊ, वाघनखं आणायला गेले होते. त्यांनी वाघनखं आणलीच नाहीत, पण आता पण, आता त्यांना खाजवायलाही नखं राहिली नाहीत. 50-60 लाख रुपये खर्च करून ते वाघनखं आणायला गेले. हे काम फोनवरूनही करता आलं असतं. आमचे मंत्री तिथं गेले अन् मोकळ्या हाताने परतेले, असा टोला त्यांनी लगावला होता. 50-60 लाख रुपये खर्च झाले हे मला काही आवडलं नाही. त्यांनी वाघनखं आणली असती तर चांगली गोष्ट होती, असं कडू म्हणाले.

Tags

follow us