Sujay Vikhe Vs Prajakt Tanpure : : अहमदनगर जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जोरदार राजकीय रणधुमाळी सुरू आहे. कर्जत, जामखेड, नगर बाजार समितीबरोबर राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जोरदार राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. त्यातून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ही बाजार समिती अनेक वर्षांपासून तनपुरे यांच्या ताब्यात आहे. या निवडणुकीत आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या ताब्यातून ही बाजार समिती हिसकाविण्यासाठी खासदार सुजय विखे, जिल्हा बँकेची अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी जोरदार शड्डू ठोकला आहे.
गेल्या ३६ वर्षांपासून राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती तनपुरे गटाच्या ताब्यात आहे. तनपुरेंचे जनसेवा मंडळ आणि बाजार समिती हे समीकरणच. नगरच्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या प्रचार सभेत तनपुरे यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर दोनच दिवसाच खासदार सुजय विखे व कर्डिले यांनी तनपुरे यांना मोठा धक्का दिला आहे. तनपुरे गटाचे बाजार समितीतील चार संचालक फोडले.
शेतकऱ्यांसाठीची खास योजना, केंद्र सरकार देतंय 90 टक्के अनुदान; आत्ताच अर्ज करा
कर्डिले यांनी राहुरी बाजार समिती ही भाजपाप्रणित विकास मंडळाच्या ताब्यात घेऊच, असा विश्वास व्यक्त केला आहे. आपण पूर्ण ताकदीनिशी बाजार समितीच्या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे कर्डिले यांनी सांगितले. तर काही स्थानिक नेत्यांनी तनपुरे यांच्यावर तनपुरे सहकारी बंद पाडल्याचा आरोप केला आहे. तनपुरे कारखान्यांवरून तनपुरे यांना विरोधक अनेकदा घेरत आहेत. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी विखे, कर्डिलेंसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे बाजार समितीची निवडणूक चुरशीची आहे.
राज्यात काही बाजार समित्या नफ्यात आहेत. बाजार समिती आहे. या बाजार समितीची वार्षिक उलाटाल सहाशे कोटींची आहे. ही बाजार समिती कायम नफ्यात राहते. या समितीची 15 कोटींच्या ठेवी आहेत. वांबोरीला उपबाजार आहे. तर आता राहुरी शहराजवळ तेरा एकर जमीन बाजार समितीने घेतली आहे.
Chandrasekhar Bawankule : सीएम पदाच्या लालचेनं ठाकरे कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर, त्यांना सत्तेचे व्यसन
त्या ठिकाणी फळ, गुरांचा बाजार, मोकळा कांदा विक्री सुरू करण्याचे नियोजन आहे. बाजार समितीचा स्वतःचा पेट्रोल पंप आहे. त्यामुळे आर्थिकदृष्टी ताकद असलेल्या संस्था ताब्यात घेण्यासाठी विखे-कर्डिले यांनी ताकद लावली आहे. तनपुरे यांनीही राहुरी बाजार समिती बाहेरच्या नेत्याच्या ताब्यात देणार का असे स्थानिक अस्मितेचा मुद्दा उचलून धरला आहे. अर्ज छाननी, माघारसाठी अजून तीन दिवस आहेत. त्यानंतर जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोप पाहिला मिळणार आहे.
https://www.youtube.com/watch?v=4UsEtvbGNqk