शेतकऱ्यांसाठीची खास योजना, केंद्र सरकार देतंय 90 टक्के अनुदान; आत्ताच अर्ज करा
PM Kusum Yojana : केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी एक विशेष योजना राबवत आहे. या योजनेंतर्गत सरकार सोलर पंप बसवण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करत आहे. पीएम कुसुम योजना असे या योजनेचे नाव आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवर सौर पॅनेल बसवण्यासाठी सरकारकडून मदत मिळते आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना सौर पंप बसवण्यासाठी 90 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. या योजनेचा लाखो शेतकऱ्यांना फायदा होतो आहे.
या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होत आहे. या माध्यमातून शेतकरी शेतात पाणी देण्यासाठी इलेक्ट्रिक ट्युबवेल वापरतात. त्यामुळे नापीक जमीन देखील वापरात आणली जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा चांगला फायदा मिळू शकतो.
अजितदादांना कसं ट्रॅक कराल?; सुप्रिया सुळेंनी दिली आयाडिया!
ही योजना केंद्र सरकारने 2019 मध्ये सुरु केली आहे. या योजनेंतर्गत 30 टक्के अनुदान केंद्र सरकार, 30 टक्के अनुदान राज्य सरकार व उरलेले 30 टक्के अनुदान इतर वित्तीय संस्थांच्या माध्यमातून दिले जाते. यामध्ये शेतकऱ्यांना फक्त 10 टक्के रक्कम द्यावे लागतात.
अजित पवार ‘देवगिरीत’ चं; कार्यक्रम रद्द करण्याचे समोर आले स्पष्टीकरण
या योजनेमुळे शेतकऱ्यांना वीज व डिझेलवरील खर्च करावा लागत नाही व त्यांचे वीजेवरील अवलंबन देखील कमी होते. त्यामुळे शेतीचा खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होतो. यासाठी तुम्ही सरकारच्या https://www.india.gov.in/ या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकता.