Download App

सुनेत्रा पवारांची RSS च्या कार्यक्रमाला हजेरी, राजकीय चर्चांना उधाण, अजितदादा काय म्हणाले?

खासदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी नुकतीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) एका कार्यक्रमाला हजेरी लावली.

  • Written By: Last Updated:

Ajit Pawar On Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) खासदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी नुकतीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) एका कार्यक्रमाला हजेरी लावली. हा कार्यक्रम अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत (Kangana Ranaut) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता. ‘राष्ट्र सेविका समिती’ च्या महिला शाखेच्या स्नेहमिलनाटा हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला सुनेत्रा पवारांनी हजेरी लावल्याने त्या चर्चेचा विषय ठरल्यात.

तत्त्वांसाठी मरण्यासही तयार! संगमनेरच्या विराट मोर्चातून बाळासाहेब थोरातांची थरकाप उडवणारी घोषणा 

कंगना रणौत यांनी या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. कंगनाने म्हटलं की, आपण एकत्रितपणे सनातन मूल्ये, हिंदू संस्कृती आणि राष्ट्रीय जाणीवेला अधिक प्रखर बनवूयात. मानवसेवा, राष्ट्र निर्माण आणि सनातन संस्कृतीच्या संरक्षणासाठी निरंतर कार्य करत राहण्याचा आम्हा सर्वांचा संकल्प आहे. महिलांची जागरूकता आणि त्यांचा सहभागच राष्ट्राला सशक्त बनवतो, असं कंगना यांनी म्हटलं.

कंगना यांनी शेअर केलेल्या फोटोत सुनेत्रा पवार यांच्या मागे स्टेजवर डॉ. केशव हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांचे फोटो दिसत आहे. मात्र, सुनेत्रा पवार यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, त्यांना स्नेहमिलनासाठी आमंत्रण मिळालं होतं म्हणून आपण या कार्यक्रमाला गेले होते, तसंच हा संघाचा कार्यक्रम आहे याची माहिती नव्हती, अशी माहिती त्यांनी दिली.

धक्कादायक, ताटात उष्टे अन्न ठेवल्याने मुलाकडून वडिलांची कुऱ्हाडीने वार करून हत्या 

दरम्यान, या घटनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, त्यांनी मिश्कीलपणं उत्तर दिले, मला याबाबत काहीच माहिती नाही. माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठे जाते, याची मला मिनिट-टू-मिनिट माहिती मला नसते. आता विचारतो का गं कुठं गेली होतीस?, या विधानाने उपस्थितांमध्ये हशा पिकला, पण या घटनेने राजकीय वातावरण ढवळून निघाले.

अजितदादा पुढं म्हणाले, मला कधी कधी… (हात जोडतात) तो तुमचा अधिकार आहे, पण आपण काय प्रश्न विचारावेत? अजित पवार वर्ध्यात आहेत, तर वर्ध्याच्या फायद्याचं विचार ना, ते दिलं सोडून, अन् कुठं ब्रेकींग देता येईल का, याचाच प्रयत्न करता, असं ते म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि RSS यांच्या विचारसरणीतील भिन्नतेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कधीही संघाच्या कार्यक्रमात दिसले नाही. मात्र, आता सुनेत्रा पवारांनी संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

follow us