Download App

‘आता तर कुठं अजितदादा हसायला शिकले, त्यांना आणखी हसवा, ते तुमच्याशी…’

Sunil Kedar on Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपमध्ये जाणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. कोर्टाचा निकाल आल्यावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे मुख्यमंत्रीपद जाणार आणि अजितदादा मुख्यमंत्री होणार अशी शक्यता वर्तवली जात होती. यावर आता काँग्रेस नेते सुनिल केदार (Sunil Kedar) यांची प्रतिक्रिया आली आहे. अजित पवार हे संघर्ष करून, तापून निघालेले नेतृत्व आहे. अजित पवार हाही माणूसच आहे. त्यांनाही समजून घेतले पाहिजे असे परखड मत सुनील केदार यांनी मांडले आहे.

सुनील केदार म्हणाले की रोज रोज एका नेत्याची प्रतिमा अशी मलिन करु नका. अजित पवार हे संघर्ष करुन, तापून निघालेले नेतृत्व आहे. अजित पवार हाही माणूसच आहे. त्यांनाही समजून घेतले पाहिजे. ते कधी कधी नाराज होतात. आता तर ते हसायला शिकले आहेत. त्यांना आणखी हसवा, ते तुमच्याशी आणखी दिलखुलास गप्पा मारतील असे केदार यांनी सांगितले.

आनंदाच्या शिधेतून नागरिकांच्या आयुष्याशी खेळ, राष्ट्रवादीचे टीकास्त्र

पहाटेचा शपथ विधी का झाला, याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या विरोधात कट असल्याचे आधीच सांगितले आहे. 2014 ते 2019 आम्ही विरोधी पक्षात असताना संघर्ष यात्रा आम्ही काढली होती. त्यानंतर 2019 मध्ये सत्ता परिवर्तन झाले होते. तेव्हा लोकांसाठी अजित पवारांनीच सर्वात जास्त सत्ता गाजवली होती. आता वज्रमूठ सभा त्याच उद्दिष्टाने घेण्यात येत आहेत. अजित पवार माझ्या विनंतीला मान देऊन सभेला आले होते.

आता सभेत कोणी भाषण द्यायचे यावर त्या त्या पक्षाने निर्णय घेतले. अजित पवार हे संभाजीनगर येथे बोलले होते. म्हणून इथे बोलले नाही. कुठल्याही गोष्टीकडे पाहण्याच प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. अजित पवार यांनी सरकारच्या स्थिरतेबद्दल केलेले वक्तव्य हा त्यांचा दृष्टिकोन होता. त्याबद्दल काँग्रेसचे मत वेगळे आहे, असे केदार यांनी सांगितले.

Tags

follow us