Sunil Tatkare : अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांना भाजपासोबत जाण्याची इच्छा होती. त्यांच मन विचलित झाले होते, असे स्वतः संजय राऊत यांनी अजित पवारांबरोबरील बैठकीत सांगितले होते. या बैठकीला स्वतः एकनाथ शिंदे, मिलींद नार्वेकर देथील उपस्थित होते, असा खळबळजनक गौप्यस्फोट खासदार तटकरे यांनी केला आहे. तटकरे यांनी काल पत्रकार परिषदेत अनेक धक्कादायक खुलासे केले.
‘चित्राताई, अशानं हसं होतं बरं का’, रोहिणी खडसेंची टीका, BJP चा अख्खा इतिहासच काढला
तटकरे पुढे म्हणाले, राज्यातील काही प्रश्नांसाठी उद्धव ठाकरे, अजित पवार,अशोक चव्हाण यांनी पीएम मोदींची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर सतत चार ते पाच दिवस संजय राऊतांचा माझ्याकडे आग्रह होता. अजित पवारांची भेट घेऊन काही चर्चा करायची होती. भेटीची वेळ ठरली पण, अजितदादांना काही कारणांमुळे पोहोचता आले नाही. त्यामुळे राऊतांना वाईट वाटलं. त्यानंतर पुन्हा दोन दिवसांनी एकत्र बसलो. त्या बैठकीत एकनाथ शिंदे आणि मिलींद नार्वेकर देखील उपस्थित होते. चर्चा सुरू असताना मोदींच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंचं मन विचलित झालं होतं. आपण पुन्हा भाजपसोबत जावं असे वाटत होतं. त्याची खात्री शिंदे-नार्वेकरांना करायला लावली. पण, उद्धव ठाकरे यांची भाजपासोबत जाण्याची इच्छा होती. त्याची कारणे काय हे तेच सांगू शकतील, असे तटकरे म्हणाले.
आम्ही घेतलेल्या भूमिकेवरसुध्दा टिकाटिप्पणी करण्याचा पत्रकार म्हणून तुम्हाला अधिकार आहे. पण लिखाणात सुसंस्कृतपणा असावा, कालपर्यंत अजितदादांसारखे नेतृत्व असू शकत नाही असे म्हणणार्या संजय राऊतांनी शंभर दिवस झाल्यानंतर अशा प्रकारची टिका टिप्पणी करणे योग्य नाही, असे स्पष्ट सांगतानाच यापेक्षा अधिक तुम्ही आमच्याशी बोलला आहात आज त्यावर भाष्य करायचे नाही असा दावाही सुनील तटकरे यांनी केला.
मुंबईतील टोल बंद होणार का? राज ठाकरे यांच्या धमक्यांना मुख्यमंत्री बधले नाहीत
संजय राऊत, तुम्ही टीका टिप्पणी जरूर करा पण तुम्ही सिंचन घोटाळ्यातील आरोपी, असा आमचा उल्लेख करता. मात्र कुठल्याही तपास यंत्रणांच्या तपासात अजितदादा किंवा मला आरोपी केले गेले नाही. उलट संजय राऊत तुम्ही आरोपी आहेत. आरोपी म्हणून आत गेलात व जामीनावर बाहेर आलात. त्यामुळे आमच्यावर बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही असेही सुनील तटकरे यांनी खडसावले.